शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक...! गळ्यात पट्टा बांधून फिरवलं, जनावराप्रमाणं पाणी पाजलं अन्...; टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून कर्मचाऱ्याला दिली अशी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:08 IST

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे...

केरळमधील कोची शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेरुम्बावूर येथील एका खाजगी कंपनीत कर्मचाऱ्याला एवढी वाईट वागणूक देण्यात आली आहे की, कुणाचाही संताप उडेल. या कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला कार्यालयात गुडघ्यांवर फिरवण्यात आले. त्याला कुत्र्याच्या भांड्यात पाणी देऊन ते कुत्र्याप्रमाणेच पिण्यास भाग पाडले गेले. एवढेच नाही, तर त्याला त्याचे कपडे काढून मारहाणही करण्यात आली. हे सर्व संबंधित कर्मचाऱ्याच्या खराब परफॉर्मेंस मुळे, शिक्षा म्हणून करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हयरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. 

केरळचे कामगार मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी यासंदर्भात अहवाल मागवला आहे. ते म्हणाले, केरळमध्ये कामगार कायद्यांची अंमलबजावणी अतिशय काटेकोरणे केली जाते. कोणत्याही परिस्थितीत कामगारांचा छळ सहन केला जाणार नाही. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

घरोघरी जाऊन वस्तू विकते कंपनी -एर्नाकुलम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना घटना घडलेल्या घराचा पत्ता मिळाला आहे. हे घर पेरुम्बावूरमधील अराक्कापदी येथे आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही एक सेल्स कंपनी आहे. जी केरळमध्ये घरोघरी जाऊन वस्तूंची विक्री करते. सुरुवातीच्या तपासात दिसून आले आहे की, संबंधित कंपनीत गेल्या तीन महिन्यांपासून एकही पुरुष कर्मचारी नाही. तेथे केवळ महिला कर्मचारीच कार्यरत आहेत. अधिकारी या सर्व महिला कर्मचाऱ्यांशी बोलत आहेत.

कंपनीविरुद्ध चौकशी सुरू -या घटनेसंदर्भात कामगार अधिकाऱ्यांनी संबंधित व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका तरुणाची चौकशी केली. यात, हा व्हिडिओ एका कर्मचाऱ्याने बनवला आहे. तो कर्मचारी व्यसनी होता आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले असल्याचे, त्या तरुणाने  सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी कंपनीविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. या कंपनीविरुद्ध यापूर्वीही तक्रार आली होती. पोलिसांनी पलारीवट्टोम येथील कंपनीच्या कार्यालयाची तपासणी केली.

खराब परफॉर्मेंस मुळे शिक्षा -खराब परफॉर्मेंस मुळे शिक्षा -कर्मचाऱ्याचा परफॉर्मेंस खराब होता म्हणून त्याला शिक्षा देण्यात आल्यचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कर्मचाऱ्याला एखाद्या कुत्र्याप्रमाणे गुडघ्यावर चालवले गेले. त्याल काही कॉइन्स जमिनीवर टाकून ते चाटण्यास सांगण्यात आले. तसेच, त्याला कुत्र्याच्या भांड्यात पाणी भरून कुत्र्यासारखेच प्यायलाही भाग पाडले गेले.

कर्मचाऱ्यांनी उघड केलं सत्य - काही कर्मचाऱ्यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जे कर्मचारी टर्गेट साध्य करण्यात अयशस्वी होतात, त्यांना कंपनी व्यवस्थापनाकडून अशा प्रकारे शिक्षा केली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कलूरमध्ये कार्यरत असलेल्या एका खाजगी मार्केटिंग कंपनीशी संबंधित आहे आणि हा गुन्हा जवळच्या पेरुम्बावूरमध्ये घडल्याचे वृत्त आहे. उच्च न्यायालयाचे वकील कुलथूर जयसिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :KeralaकेरळEmployeeकर्मचारीPoliceपोलिस