शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची नक्कल करणं पडलं महागात, कॉमेडियन श्याम रंगीला शोमधून आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 15:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करणं एका कॉमेडियनला चांगलंच महागात पडलं आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करणं एका कॉमेडियनला चांगलंच महागात पडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्यामुळे कॉमेडियन श्याम रंगीलाला  ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करणं एका कॉमेडियनला चांगलंच महागात पडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केल्यामुळे कॉमेडियन श्याम रंगीलाला  ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे एपिसोडमध्ये त्याने केलेली मोदींची मिमिक्री ऑन एअर दाखवली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याआधी श्याम रंगाली यांने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही मिमिक्री केली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करता येणार नाही, तुला शोसाठी नवीन कंटेंट तयार करावा लागेल, असं श्यामला सांगण्यात आलं. कंटेंट तयार करण्यासाठी त्याला फारसा वेळही देण्यात आला नाही. पर्यायाने त्याचं एलिमिनेशन करण्यात आलं.या प्रकारामुळे 22 वर्षांचा श्याम रंगाली यांने कार्यक्रमाच्या टीमवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी मोदींची नक्कल करण्यात माहीर असल्याचं त्यांना माहित होतं. मग शोमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणच का दिलं? असा सवाल श्यामने उपस्थित केला आहे.

'मोदींची नक्कल करता येणार नाही, हे त्यांनी आधी सांगितलं होतं. सुरुवातीला राहुल गांधींची मिमिक्री केल्यावर कुणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. त्याबद्दल तेव्हा कुणालाही हरकत नव्हती. पण अचानक त्यांनी राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी  यापैकी कोणाचीही मिमिक्री करता येणार नाही, असं सांगितलं. मी पंतप्रधानांना शिव्या तर घातल्या नव्हत्या. मी फक्त मिमिक्री केली. त्यात काय वेगळं?’ असा सवाल श्यामने उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांची मिमिक्री करण्यामुळे श्याम रंगीला प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये बोलविण्यात आलं. 

श्याम रंगीला कोण आहे?श्याम रंगीला हा राजस्थानचा रहिवासी आहे. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातल्या रायसिंहनगरमधील मोहकमवाला गावात लहानाचा मोठा झाला. 2004 मध्ये शाळेतूनच त्याने मिमिक्रीला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्याला कॉमेडियन होण्याची इच्छा होती. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने मिमिक्री करणं सुरु केलं.

सुनील पालने केलं समर्थनप्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी श्याम रंगीलाची समर्थन केलं आहे. नेत्यांची मिमिक्री करण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो निखळ विनोद असायला हवा, असं सुनील पाल यांनी म्हंटलं. ‘मी नाना पाटेकर, इरफान खान यासारख्या अनेक अभिनेत्यांची मिमिक्री केली आहे, पण कोणी कधीच आक्षेप घेतला नाही.’ असं सुनील पाल यांनी सांगितलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी