टंचाईग्रस्त ८३ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण १७ गावांमध्ये टँकर : १४ गावांचा विंधन विहिरीसाठी प्रस्ताव

By Admin | Updated: February 3, 2016 00:28 IST2016-02-03T00:28:36+5:302016-02-03T00:28:36+5:30

जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमधून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

Out of 83 villages in the scarcity, acquisition of wells 17 tankers in villages: Proposals for 14 wells for dams | टंचाईग्रस्त ८३ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण १७ गावांमध्ये टँकर : १४ गावांचा विंधन विहिरीसाठी प्रस्ताव

टंचाईग्रस्त ८३ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण १७ गावांमध्ये टँकर : १४ गावांचा विंधन विहिरीसाठी प्रस्ताव

गाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमधून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.
यावर्षी जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांची संख्या ५२६ इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी टँकरने पाणी वाटप, टंचाई आराखड्यातून पाणी योजना अशा उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

तीन टप्प्यात टंचाईचे नियोजन
टंचाई भासणार्‍या गावांचे जिल्हा प्रशासनाने तीन टप्प्यात नियोजन केले आहे. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ कालावधीत ४५ गावांचा समावेश होता. जानेवारी ते मार्च या दरम्यान १२२ गावांमध्ये तर एप्रिल ते जून या काळात ३५९ गावांमध्ये पाणी टंचाई भासणार आहे.

धरणगाव व अमळनेरमध्ये सर्वाधिक अधिग्रहण
फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी प्रयत्न सुरु केले आहे. आतापर्यंत ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात जामनेर तालुक्यातील नऊ , धरणगाव तालुक्यातील २२ गावांमधील २३, एरंडोल तालुक्यातील सात, भुसावळ तालुक्यातील चार गावांमधील तीन, बोदवड तालुक्यातील पाच गावांमधील, पाचोरा तालुक्यातील चार, चाळीसगाव तालुक्यातील तीन, भडगाव तालुक्यातील तीन, अमळनेर तालुक्यातील २१, पारोळा तालुक्यातील पाच गावांतील विहिर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

इन्फो-
टँकरची संख्या वाढली
जिल्हा प्रशासनाकडे पारोळा तालुक्यातील वरखेडेसिम, वाघरा-वाघरी, पोपटनगर, टिहू, भंडणीकर व मंगरुळ या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, भोरखेड, कटारे व वामरे तर जळगाव तालुक्यातील देव्हारी या गावांमध्ये यापूर्वी टँकर सुरु होते. पूर्वीचे १२ आणि जामनेर तालुक्यातील पाच अशा १७ गावांमध्ये दहा टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: Out of 83 villages in the scarcity, acquisition of wells 17 tankers in villages: Proposals for 14 wells for dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.