पालिकेचे ४.६१ कोटी थकीत
By Admin | Updated: September 22, 2014 04:53 IST2014-09-22T04:53:56+5:302014-09-22T04:53:56+5:30
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येक निवडणुकीला मनुष्यबळ, वाहनं आणि जागा मुंबई महापालिकेमार्फत पाठविण्यात येत आहे

पालिकेचे ४.६१ कोटी थकीत
- शेफाली परब- पंडीत
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येक निवडणुकीला मनुष्यबळ, वाहनं आणि जागा मुंबई महापालिकेमार्फत पाठविण्यात येत आहे. मात्र याची आर्थिक भरपाई निवडणूक कार्यालयाकडून होत नसल्यामुळे प्रशासनाने आता कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार २00९ पासून थकीत असलेले चार कोटी ६१ लाख रुपये ॅहा निवडणुकीचा खर्च लवकर चुकता करण्याची सूचना जिल्हाधिकार्यांना करण्यात आली आहे.
पालिकेतून मिळालेल्या आकडेवारीनुसार मे २0१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील खर्च शहरातून ६९.६९ लाख रुपये तर पश्चिम उपनगरांतून १४. ७४ लाख रुपये येणे आहे. तर २00९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांचा दोन कोटी ४६ लाख रुपये खर्च अद्याप निवडणूक आयोगाकडून मिळालेला नाही. पूर्व उपनगरांतून एक कोटी ११ लाख रुपये २00९ पासून येणे आहे. यामध्ये आणखी ११ लाख ९५ हजार रुपयांची यंदाच्या निवडणुकीत भर पडली आहे.
दी रिप्रिझेन्टेशन ऑफ पीपल्स अँक्ट १९५१, कलम १६१ अंतर्गत निवडणूक आयोगाला स्थानिक महापालिकेने केलेल्या खर्चाची भरपाई देणे भाग आहे. त्यामुळे हा खर्च मिळावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाला तसेच शहर व उपनगर जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून सुचित करण्यात आले आहे. मात्र अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले.