सुटकेस सरकारपेक्षा सूटबुटातील आमचे सरकार अधिक स्वीकारार्ह
By Admin | Updated: May 30, 2015 23:36 IST2015-05-30T23:36:36+5:302015-05-30T23:36:36+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सुटकेस सरकारपेक्षा सूटबुटातील सरकार निश्चितच स्वीकारार्ह आहे, असा टोला लगावला आहे.
सुटकेस सरकारपेक्षा सूटबुटातील आमचे सरकार अधिक स्वीकारार्ह
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सुटबुटातील सरकार अशी टीका करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सुटकेस सरकारपेक्षा सूटबुटातील सरकार निश्चितच स्वीकारार्ह आहे, असा टोला लगावला आहे.
काँग्रेसला आता अचानक गरिबांची आठवण झाली आहे. काँग्रेसच्या अदूरदर्शी धोरणांमुळे या देशातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि गरीब गरीबच राहिले, असा आरोपही त्यांनी शनिवारी एका मुलाखतीदरम्यान केला. काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, कोळसा, स्पेक्ट्रम आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याने गरिबांना काय मिळाले? केवळ निवडक उद्योगपती आणि ठेकेदारांना याचा फायदा झाला, हे सर्वांनाच माहीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४माजी सैनिकांसाठी एक पद, एक पेन्शनच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मोदी म्हणाले, आम्ही एक पद, एक पेन्शनसाठी वचनबद्ध आहोत. तूर्तास याच्या व्याख्येसंदर्भात संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसोबत आमचा विचारविनिमय सुरू आहे.
४आमचे सरकार पाच वर्षांसाठी आहे आणि आम्ही संबंधित लोकांसोबत विचारविनिमय केल्याशिवाय काही करू शकत नाही. चर्चेला वेग आला असून या मुद्यावर कुठलाही संशय बाळगण्याची गरज नाही.