शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याची गरज नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 10:12 IST

मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. टिकेचे धनी झालेले सरकार यामधून मार्ग काढण्यासाठी दुसरे पर्याय शोधत आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार इतर ओळखपत्रांच्या सहाय्याने वेरिफिकेशन प्रोसेस पुर्ण करण्याचा विचार करत आहेयामध्ये रेशन कार्ड, लायसन्स आणि पासपोर्टचा समावेश करण्यात आला आहेपण अद्याप याप्रकरणी अंतिम निर्णय झालेला नाही

नवी दिल्ली - मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. टिकेचे धनी झालेले सरकार यामधून मार्ग काढण्यासाठी दुसरे पर्याय शोधत आहे. गोपनीयतेच्या अधिकाराअंतर्गत लोक सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार इतर ओळखपत्रांच्या सहाय्याने वेरिफिकेशन प्रोसेस पुर्ण करण्याचा विचार करत आहे. यामध्ये रेशन कार्ड, लायसन्स आणि पासपोर्टचा समावेश करण्यात आला आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिका-याने माहिती दिली आहे की, 'आम्ही इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी तयार आहोत. रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कागदपत्रांचा वापर करण्यात येईल का यासंबंधी आम्ही विचार करत आहोत. पण अजून याप्रकरणी अंतिम निर्णय झालेला नाही. यासोबत आमचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणारा असला पाहिजे. आम्ही प्रक्रियेसोबत छेडछाड करु शकत नाही'. 

दूरसंचार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व मोबाइल कंपन्यांना मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश दिला आहे. दूरसंचार विभागाने 23 मार्च रोजी मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने बँक खात्यांप्रमाणे मोबाइल क्रमांकही आधार कार्डशी जोडणं अनिवार्य केलं आहे. लिंक न केल्यास एका ठराविक तारखेनंतर मोबाइल क्रमांक बंद केला जाईल. जर तुम्हीदेखील अद्याप लिंक केलं नसेल, तर तात्काळ करुन घ्या, अन्यथा 28 फेब्रुवारी 2018 नंतर मोबाइल क्रमांक बंद करण्यात येईल. दुसरीकडे बुधवारी सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना, वेगवेगळ्या सेवांसाठी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं आहे. 

'काय हवं ते करा, पण आधारला मोबाइलसोबत लिंक करणार नाही' - ममता बॅनर्जीपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपण आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, 'मी आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नाही. जर त्यांना हवं असेल तर त्यांनी माझा मोबाइल क्रमांक बंद करुन टाकावा. पण मी आधार लिंक करणार नाही'. याचवेळी ममता बॅनर्जी यांनी लोकांनाही आपल्याला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी बोलल्या आहेत. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय