अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनात धरणे राहुल जगताप : श्रीगोंदा माफियाराज वाढल्याचा आरोप
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:28+5:302015-03-06T23:07:28+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात गुन्हेगारी आणि माफियाराज वाढले आहे. सामान्यांना न्याय देण्याऐवजी आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते. तालुक्यातील बीट हवालदारांची भाकरी फिरवा अन्यथा अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला आहे.

अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनात धरणे राहुल जगताप : श्रीगोंदा माफियाराज वाढल्याचा आरोप
श रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात गुन्हेगारी आणि माफियाराज वाढले आहे. सामान्यांना न्याय देण्याऐवजी आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जाते. तालुक्यातील बीट हवालदारांची भाकरी फिरवा अन्यथा अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला आहे.शुक्रवारी माजी आमदार शिवाजीराव नागवडे, कुकडी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप, सभापती अर्चना पानसरे, श्रीगोंदा कारखान्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रा. तुकाराम दरेकर आदींनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांची भेट घेऊन पोलिसांच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.शिवाजीराव नागवडे म्हणाले की, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. वाळू तस्करांचे माफियाराज पोसण्याचे काम पोलीस करीत आहेत. दरोडे, खुनाचे प्रकार वाढले आहेत. तपासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. पोलिसांकडून भ्रमनिरास होत आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनला कारभारी द्या.कुंडलिकराव जगताप म्हणाले, राज्यात सरकार बदलले अन् तालुक्यात सत्तांतर झाले आहे, मात्र पोलीस यंत्रणा कुणाच्या इशार्यावर काम करते, कुणाकडून कशा पद्धतीने माया मिळविली जाते, याची नार्को टेस्ट केली तर सारे गौडबंगाल बाहेर येईल. राजेंद्र नागवडे व प्रा. दरेकर यांनी गुन्हेगारीकडे लक्ष वेधले.बीट हवालदार बदलणार :पोलीस यंत्रणा सतर्क असल्यामुळे गुन्हेगारी कमी झाली आहे. गुन्ह्याचा तपास केला जात आहे. मात्र काही बीट हवालदारांच्या विरोधात असलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन बीट हवालदारांचे तडकाफडकी बीट बदलणार आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक द्यावा म्हणून जिल्हा पोलीसप्रमुखांना अहवाल पाठविणार आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीची दखल घेणार आहे, असे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.(अपूर्ण.....)