वोक्हार्टमध्ये संधिवात शिबिराचे आयोजन

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:34+5:302015-07-10T23:13:34+5:30

(६ बाय २)

Organizing Rheumatic Camp in Wockhardt | वोक्हार्टमध्ये संधिवात शिबिराचे आयोजन

वोक्हार्टमध्ये संधिवात शिबिराचे आयोजन

(६
बाय २)
वोक्हार्टमध्ये संधिवात शिबिराचे आयोजन
नागपूर : वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूरच्यावतीने संधिवात आणि जॉईंट पेन यावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराची सुरुवात दुपारी १२ वाजता होऊन ४ वाजेपर्यंत नागरिकांची तपासणी करण्यात आली. शिबिरात दोन्ही गुडघ्यावर सूज आलेले रुग्ण, चालताना त्रास होणारे रुग्ण तसेच चढताना त्रास होणाऱ्या रुग्णांची तपासणी जॉईंट रिप्लेसमेंट कन्सलटंट डॉ. लघुवेंदु शेखर यांनी केली. यावेळी रुग्णांना एक्स रे आणि पॅथॉलॉजीच्या तपासणीवर २० टक्के सवलत देण्यात आली. शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. वोक्हार्ट हॉस्पिटल हे रुग्णसेवा, सुरक्षेच्या दृष्टीने तत्पर आहे.

Web Title: Organizing Rheumatic Camp in Wockhardt