ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण वर्गाचे आयोजन

By Admin | Updated: May 8, 2014 21:08 IST2014-05-08T21:08:13+5:302014-05-08T21:08:13+5:30

नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार व कामगार कुटुंबीयांकरिता ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ जूनपासून ललित कला भवन, शिवाजी चौक, भाजी मंडईजवळ, सिडको येथे शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर वर्गात प्रवेश घेणारा विद्यार्थी किमान १० वी पास असावा. या वर्गाकरिता तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर शिबिराची संपूर्ण माहिती तसेच प्रवेश अर्जासाठी ललित कला भवन, सिडको येथे संपर्क साधावा. प्रवेश अर्ज दि. ३० पर्यंत उपलब्ध आहे. सदर शिबिरात परिसरातील तसेच नाशिक नगरीतील कामगार कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाच्या सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांनी केले आहे.

Organizing Librarian Certification Teaching Class | ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण वर्गाचे आयोजन

ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण वर्गाचे आयोजन

शिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार व कामगार कुटुंबीयांकरिता ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ जूनपासून ललित कला भवन, शिवाजी चौक, भाजी मंडईजवळ, सिडको येथे शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर वर्गात प्रवेश घेणारा विद्यार्थी किमान १० वी पास असावा. या वर्गाकरिता तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर शिबिराची संपूर्ण माहिती तसेच प्रवेश अर्जासाठी ललित कला भवन, सिडको येथे संपर्क साधावा. प्रवेश अर्ज दि. ३० पर्यंत उपलब्ध आहे. सदर शिबिरात परिसरातील तसेच नाशिक नगरीतील कामगार कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन नाशिक विभागाच्या सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांनी केले आहे.

Web Title: Organizing Librarian Certification Teaching Class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.