आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
कल्याण : चलचित्रपटापूर्वी कल्याणात शांबरिका पद्धतीचे नैसर्गिक रंगाचा वापर करून चलत चित्रपट निर्माण करण्याचे प्रयोग पटवर्धन कुटुंबाने केले होते. त्याचप्रमाणे टुरिंग टॉकीज (फिरती चित्रपट गृहे) आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा तरुणपीढीला परिचय व्हावा या दृष्टीने कल्याणात २५ ते २९ डिसेंबर अखेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे असे चित्रपट अभिनेते दिग्दर्शक संदीप नवरे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
क ्याण : चलचित्रपटापूर्वी कल्याणात शांबरिका पद्धतीचे नैसर्गिक रंगाचा वापर करून चलत चित्रपट निर्माण करण्याचे प्रयोग पटवर्धन कुटुंबाने केले होते. त्याचप्रमाणे टुरिंग टॉकीज (फिरती चित्रपट गृहे) आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा तरुणपीढीला परिचय व्हावा या दृष्टीने कल्याणात २५ ते २९ डिसेंबर अखेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे असे चित्रपट अभिनेते दिग्दर्शक संदीप नवरे यांनी सांगितले.कल्याण शहराची ऐतिहासिक नगरी म्हणून प्रथम पासून ओळख आहे. पण या बरोबरच सांस्कृतिक, कलानगरी म्हणूनही कल्याण शहराचा ठसा आहे. या शहरात अनेक नवे-जूने नाट्य, चित्रपट कलाकार, नाट्यलेखक राहतात या सर्वांचे नाट्यचित्रपट क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. हे लक्षात घेऊन येथील वासुदेव बळवंत फडके मैदानात आयोजित या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटन करणार आहेत. महत्वाचे म्हणजे कोणाकडून ही अनुदान न घेता शहरातील कलाक्षेत्राशी संबंधीत तरुण, रसिक यांच्या साईभूमी क्रिएशन या संस्थेने महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात आंतरराष्ट्रीय तसेच विविध राज्यातील गाजलेले प्रादेशिक १५ चित्रपट दाखविण्यात येणार असून महोत्सवाला भेट देणार्यांना कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. फक्त ५० रु. नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. महोत्सवासाठी दिग्गज कलाकार कल्याणात येणार आहेत. त्यांच्याशी सुसंवाद तसेच महेश मांजरेकर यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.(वार्ताहर)विनायक बेटावदकर.......................वाचली- नारायण जाधव