शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बुद्धिस्ट स्टडी सेंटरसाठी संघटना सरसावल्या

By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST

बुद्धिस्ट स्टडी सेंटरसाठी संघटना सरसावल्या विद्यापीठासमोर करणार आंदोलन : इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी नागपूर : देशविदेशातील विद्यार्थ्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट स्टडी सेंटर दिले आहे. यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ...


बुद्धिस्ट स्टडी सेंटरसाठी संघटना सरसावल्या

विद्यापीठासमोर करणार आंदोलन : इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

नागपूर :
देशविदेशातील विद्यार्थ्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट स्टडी सेंटर दिले आहे. यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मागील ८ वर्षांपासून या सेंटरच्या इमारतीचे काम रखडलेलेच आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकशित करून लक्ष वेधताच विविध संघटना सरसावल्या आहेत. यासंबंधात विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा संघटनांनी दिला आहे.
बुद्धिस्ट स्टडी सेंटरच्या इमारतीचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी सर्वाधिक पाली प्राकृत विभाग आग्रही आहे. कारण सध्या स्टडी सेंटरचे वर्ग पाली प्राकृत विभागातच भरविले जात आहे. यासंबंधात लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध अनेक संघटनांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. शेंडेनगर येथील शाक्यमुनी बुद्ध विहारातील अर्चना मेंढे, रंजना पाटील, शर्मिला चंद्रिकापुरे, वंदना बनकर, सविता डोईफोडे, बोधिमग्गो सेवा संस्थेचे अध्यक्ष भंते बोधी विनित, शंकरराव निकोसे यांनी विद्यापीठाविरुद्ध निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. जयताळा रोड टाकळी सीम बुद्ध विहारातील साधना नारनवरे, रुपा पथाडे, उज्ज्वला मेश्राम, शामकला भगत, रिता नगराळे, शामला आमटे, सम्राट अशोक बुद्ध विहारातील तेजस्विनी सहारे, रेखा बडोले, दीपक कोचे, ज्योती वानखेडे, अखिल भारतीय भिक्खूसंघ बुद्ध विहार कपिल नगर येथील नम्रता लांजेवार, सुहासिनी हिरेखण, माया मुनघाटे, आशा इंगळे, प्रेरणा वानखेडे आणि रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे, बबन बोंदाटे, अमन सोनटक्के यांनी बुद्धिस्ट स्टडी सेंटरच्या इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. तातडीने काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
बॉक्स..
आपण स्वत: आंदोलनात उतरू

बुद्धिस्ट स्टडी सेंटर हे नागपूरच नव्हे तर विदर्भासाठी महत्त्वपूर्ण आहे. यासाठी निधीसुद्धा आला आहे. तेव्हा इमारतीचे काम तातडीने सुरू करावे. विद्यापीठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, याविषयाला घेऊन मी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

भदंत सदानंद महाथेरा सद्धमादित्य
संघानुशासक - अखिल भारतीय भिक्खू संघ