नारणे येथील कामांच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: February 23, 2016 00:02 IST2016-02-23T00:02:56+5:302016-02-23T00:02:56+5:30
जळगाव- नारणे ता.धरणगाव येथील स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामासंबंधी चौकशी करून त्याबाबत २४ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जि.प.च्या ग्रा.पं. विभागाने धरणगाव बीडीओंना सोमवारी सायंकाळी दिले. गावातील विविध कामे, वैयक्तीक शौचालये व घरकुलांबाबत झालेली फसवणूक आदी मुद्द्यांवर शिवराम पाटील यांच्या नेतृत्वात नारणे येथील ग्रामस्थांनी जि.प.समोर सत्याग्रह सुरू केला होता.

नारणे येथील कामांच्या चौकशीचे आदेश
ज गाव- नारणे ता.धरणगाव येथील स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामासंबंधी चौकशी करून त्याबाबत २४ पर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जि.प.च्या ग्रा.पं. विभागाने धरणगाव बीडीओंना सोमवारी सायंकाळी दिले. गावातील विविध कामे, वैयक्तीक शौचालये व घरकुलांबाबत झालेली फसवणूक आदी मुद्द्यांवर शिवराम पाटील यांच्या नेतृत्वात नारणे येथील ग्रामस्थांनी जि.प.समोर सत्याग्रह सुरू केला होता. या सत्याग्रहास सोमवारी सात दिवस पूर्ण झाले. आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जि.प. अध्यक्ष प्रयाग कोळींना भेटण्याची वेळ मागितली. पण अध्यक्ष कोळी भेटत नसल्याचे लक्षात घेता ग्रामस्थांनी अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. तीन तास हे आंदोलन चालले. शेवटी त्याची दखल प्रशासनाने घेतली व चौकशी अहवाल मागविला. सत्याग्रहास सहा दिवस पूर्ण झाले तरी त्याची दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी सीईओंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण सीईओ नसल्याने त्यांना भेटले नाहीत. नंतर त्यांनी ग्रा.पं. विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कुटे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण कुटे यांनी यासंदर्भात दोषी ग्रामसेवक व इतर विषयांवर आताच कारवाई करणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांना सांगितले. नंतर ग्रामस्थांनी अध्यक्ष दालनासमोर ठिय्या मांडला. ग्रामसेवकावर कारवाई का करीत नाही?गावात सार्वजनिक शौचालयाचे निकृष्ट बांधकाम केले. ते आता पाडण्यात आले. वैयक्तीक लाभाच्या शौचालयांची यादी जि.प.तर्फे दिली जात नाही. स्मशानभूमी एका खाजगी व्यक्तीच्या शेतात बांधली. ती संबंधित वापरू देत नाही. या सर्वच प्रकारांची चौकशी जि.प.ने केली नाही. या प्रकारांना तत्कालीन ग्रामसेवक कैलास शरद राणे हे दोषी आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यास बीडीओ, ग्रा.पं.विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असमर्थता दाखविली. ते सीईओंकडे बोट दाखवितात. सीईओंच्या दबावामुळे ग्रामसेवकावर कारवाई होत नाही, अशी तक्रार शिवराम पाटील, डॉ.सरोज पाटील व इतरांनी केली. एन.जे.पाटील यांची पोलिसात तक्रारनारणे येथील सार्वजनिक शौचालय, ग्रा.पं. भवन आदींच्या बांधकामाबाबत दोषींवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. जिल्हाधिकारी व सीईओंनी याबाबत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याचे जस्टीस फॉर पीपलचे सचिव एन.जे.पाटील यांनी सांगितले.