बंदी घातलेली औषधे जप्त करण्याचे आदेश
By Admin | Updated: November 26, 2014 02:36 IST2014-11-26T02:36:36+5:302014-11-26T02:36:36+5:30
छत्तीसगड उच्च न्यायालयाने नसबंदी प्रकरणातील बंदी घातलेल्या व निकृष्ट दर्जाच्या औषधांना जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

बंदी घातलेली औषधे जप्त करण्याचे आदेश
विलासपूर : छत्तीसगड उच्च न्यायालयाने नसबंदी प्रकरणातील बंदी घातलेल्या व निकृष्ट दर्जाच्या औषधांना जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. यात नसबंदीच्या शक्रियेत वापरलेले सिप्रोसिन-5क्क् हेही औषध समाविष्ट आहे.
नसबंदी शक्रियांदरम्यान 13 महिलांचा मृत्यू झाला होता, तर अनेकींची प्रकृती गंभीर झाली होती. ही औषधे ज्यांनी घेतली आहेत त्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे व त्यासाठी आरोग्य शिबिरे घेण्याविषयीही न्यायालयाने सांगितले आहे.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. टी.पी.शर्मा व न्या. इंदरसिंग उपवेजा यांनी हे आदेश दिले. काँग्रेस नेते मणिशंकर पांडे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे. (वृत्तसंस्था)