गोडसेच्या मंदिरासाठी हिंदू महासभेचे भूमिपूजन चौकशीचे आदेश

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:08+5:302014-12-25T22:41:08+5:30

मेरठ-अखिल भारतीय हिंदू महासभेने बुधवारी येथील शारदा मार्गावर म. गांधींची हत्या केलेल्या नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याकरिता भूमिपूजन केल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.

Order of the Hindu Mahasabha's Bhumi Pujan inquiry for Godse temple | गोडसेच्या मंदिरासाठी हिंदू महासभेचे भूमिपूजन चौकशीचे आदेश

गोडसेच्या मंदिरासाठी हिंदू महासभेचे भूमिपूजन चौकशीचे आदेश

रठ-अखिल भारतीय हिंदू महासभेने बुधवारी येथील शारदा मार्गावर म. गांधींची हत्या केलेल्या नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याकरिता भूमिपूजन केल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आचार्य मदन यांनी गोडसेला खरा राष्ट्रभक्त असे संबोधले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राम मंदिर आणि जम्मू काश्मिरातील ३७० व्या कलमाच्या रद्द करण्याबाबत निर्भर्त्सना केली आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी नवनीत सिंग चहल यांनी, जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल गंभीरपणे घेतली असल्याचे सांगून, यात सामील असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
एसएसपी ओंकार सिंग यांनी, ही घटना गंभीर आहे व त्याचा अहवाल आपण मागविला असल्याचे म्हटले. हा अहवाल आल्यानंतर आरोपींविरुद्ध कारवाई केली जाईल. शहराच्या शांतता व सुव्यवस्थेसोबत कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असेही पुढे म्हटले आहे.
बुधवारी महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी कथित रूपाने भूमिपूजन करताना गोडसेला खरा देशभक्त सांगून त्याचे मंदिर बनविण्याची घोषणा केली होती.

Web Title: Order of the Hindu Mahasabha's Bhumi Pujan inquiry for Godse temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.