अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
By Admin | Updated: January 30, 2017 00:56 IST2017-01-30T00:56:11+5:302017-01-30T00:56:11+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे आदेश निवडणूक आयोगाने गोव्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे आदेश निवडणूक आयोगाने गोव्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोव्यातील एका निवडणूक रॅलीत बोलताना केजरीवाल यांनी आक्षेपार्ह विधान केले होते.
केजरीवाल म्हणाले होते की, जर राजकीय पक्ष पैसे देत असतील तर ते घ्या. पण, मतदान आप पक्षालाच करा. तथापि, माझे तोंड बंद करुन आयोग भ्रष्टाचारास प्रोत्साहन
देत आहे, असेही केजरीवाल
म्हणाले होते.