शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने मद्यपान करावे म्हणून पती न्यायालयात, पुरुषाच्या घरातील मंडळींचाही आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 04:35 IST

पती दारू पितो, अशी अनेक महिलांची तक्रार असते. पतीच्या या व्यसनामुळे अनेक जणी घटस्फोटासाठीही अर्ज करतात; पण...

भोपाळ  - पती दारू पितो, अशी अनेक महिलांची तक्रार असते. पतीच्या या व्यसनामुळे अनेक जणी घटस्फोटासाठीही अर्ज करतात; पण आपली पत्नी दारू पीत नाही, तिला मद्यपान करायला सांगा, अशी विनंती मध्यप्रदेशातील एका पुरुषाने भोपाळच्या कुटुंब न्यायालयात केल्याने तेथील कायदेशीर सल्लागारही चकित झाले आहेत.या दाम्पत्याच्या विवाहाला १० वर्षे होऊ न गेली आहेत. त्यांना तीन मुले असून, सर्वात मोठे मूल ९ वर्षांचे आहे. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील हा पुरुष खासगी कंपनीत नोकरी करतो; पण आपल्या पत्नीने मद्यपान करावे, असा त्याचा आग्रह आहे. आपले वडील, आई, भाऊ , आत्या, मामा व तसेच चुलत भाऊ असे सारेच जण मद्यपान करतात, त्यामुळे पत्नीनेही मद्यपान करायला हवे, असे त्या पुरुषाचे म्हणणे आहे.त्याच्या घरातील सर्वांच्या मद्यपानाला पत्नीने कधीही विरोध केला नाही; पण कौटुंबिक समारंभ वा पार्टीमध्ये ती ज्यूस पीतअसे.दोघांचा विवाह झाल्यापासून पतीने तिला मद्यपानासाठी आग्रह चालवला होता; पण तिने सातत्याने नकारच दिला. आता मात्र प्रकरण हातघाईला आले आहे.तिने मद्यपान करावे, यासाठी तो करीत असलेल्या आग्रहाचा तिला त्रास व्हायला लागला आहे. आमच्या घरात कोणीच दारू पीत नव्हते आणि नाही. त्यामुळे मला ते आवडत नाही आणि माझ्या मुलांनीही कधी मद्यपान करू नये, असे माझे म्हणणे आहे, असे पत्नीचे म्हणणे आहे.सुरुवातीला तो मद्यपानासाठी आग्रह करायचा वा कौटुंबिक समारंभात मद्यपान असायचे, तेव्हा ती मुलांसह माहेरी जायची; पण आता तिने माहेरी न जाण्याचा आणि नवऱ्याचा वा सासू-सासरे यांचा आग्रहही न मानण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण न्यायालयात आले आहे. (वृत्तसंस्था)सल्लागारही गोंधळलेएखाद्याचे मद्यपान सोडवण्यासाठी समजूत घालता येते वा काही उपचारांनी ते बंदही करता येते; पण मद्यपान करायला भाग कसे पाडायचे, हा प्रश्नच आहे. भोपाळ कुटुंब न्यायालयाचे सल्लागार शैल अवस्थी यांनाही या प्रकरणाचे काय करायचे, हे कळेनासे झाले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFamilyपरिवारCourtन्यायालय