अवाजवी घरपीची देयके रद्द करण्याचे आदेश
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:38+5:302015-02-14T23:50:38+5:30

अवाजवी घरपीची देयके रद्द करण्याचे आदेश
>शहादा (जि. नंदुरबार) : नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेच्या करपात्र मूल्यांची फेरआकारणी करताना नागरिकांकडून अवाजवी घरपीची देयके देण्यात आली. ती रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.तब्बल पाच वर्षानंतर याचिकांचा निकाल लागला. शहादा नगरपालिकेने २०१५ मध्ये मिळकतीचे पुनर्मूल्यांकन करून सन २००९-१० ते २०१२-१३ करीता वाढीव घरपीची बिले दिली होती. त्यावर सात मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेत घरपी कमी करण्याबाबत अपील केले. शहादा न्यायालयाने हे सर्व अपील मंजूर करून तब्बल पाच वर्षानंतर याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय देत वाढीव घरपीची बिले रद्द केली. (प्रतिनिधी)