मोदींना शैतान म्हणणा-या अकबरुद्दीन ओवैसींच्या अटकेचे आदेश
By Admin | Updated: October 7, 2015 12:49 IST2015-10-07T12:06:56+5:302015-10-07T12:49:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शैतान व क्रूर म्हणणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांना अटक करण्याचे आदेश किशनगंजचे पोलीस अधीक्षक राजीव रंजन यांनी दिले आहेत.

मोदींना शैतान म्हणणा-या अकबरुद्दीन ओवैसींच्या अटकेचे आदेश
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ७ - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांना अटक करण्याचे आदेश किशनगंजचे पोलीस अधीक्षक राजीव रंजन यांनी दिले आहेत. रविवारी बिहारमधील किशनगंज येथील सभेत अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुजरात दंगलीवरुन मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख शैतान व क्रूर असा केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात किशनगंज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
किशनगंजमधील सभेत अकबरुद्दीन यांनी मोदींवर तिखट शब्दांत प्रहार केला होता. गुजरातमधील दंगलीत मुसलमानांना चोहोबाजूंनी घेरुन मारले जात होते, या दंगलींसाठी मोदीच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला होता. दंगलीतील दोषींच्या हातात बेड्या असत्या तर काँग्रेस मुसलमानांसाठी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असते, असे त्यांनी म्हटले होते.