अकबरुद्दीन ओवेसींच्या अटकेचे आदेश
By Admin | Updated: October 8, 2015 03:58 IST2015-10-08T03:58:23+5:302015-10-08T03:58:23+5:30
निवडणूक सभेदरम्यान कथित प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलिमिन (एआयएमआयएम)चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या

अकबरुद्दीन ओवेसींच्या अटकेचे आदेश
किशनगंज (बिहार) : निवडणूक सभेदरम्यान कथित प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलिमिन (एआयएमआयएम)चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या अटकेचे आदेश बिहार पोलिसांनी जारी केले आहेत. बिहार निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या एआयएमआयएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अटक वॉरंट निघाल्यानंतर अकबरुद्दीन यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
सोमवारी किशनगंज जिल्ह्याच्या कोचाधमन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर बुधवारी पोलीस अधीक्षक राजीव रंजन यांनी ओवेसींच्या अटकेचे आदेश जारी केले. अकबरुद्दीन यांनी येथील निवडणूक सभेला संबोधित केले होते.