बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश रद्द
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:08+5:302015-02-10T00:56:08+5:30
बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश रद्द

बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश रद्द
ब जार समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश रद्दखंडपीठाचा दणका : आधीच्या संचालक मंडळांकडे कारभार सोपविण्याचे निर्देशऔरंगाबाद : शासनाच्या आदेशाने राज्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांनी काढलेले आदेश औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी रद्द ठरवले. याचिकाकर्त्या संचालक मंडळांकडे बाजार समितीचा कारभार सोपविण्याचे आदेश प्रशासकांना देण्यात आले आहेत.ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपलेली आहे, ती मंडळे बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानंतर पणन संचालक कार्यालयाकडून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा उपनिबंधकांना तोंडी संदेश देऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार १५ बाजार समित्यांची संचालक मंडळे बरखास्त केली होती. याबाबतच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेऊन सोमवारी निकाल देण्यात आला. (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़चौकटया समित्यांचा कारभार संचालक मंडळांकडे लातूर, भोकर, कळंब, उमरगा, मुरुम, जळगाव, चोपडा, जामनेर, चाळीसगाव, बोधवड, पारोळा, भुसावळ, नेवासा, शेवगाव आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी ११ आणि १२ नोव्हेंबर २०१४ रोजी काढले आणि तेथे प्रशासक नियुक्त केला. या आदेशाला राज्यातील १५ संचालक मंडळांनी औैरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यातील लातूरशिवाय अन्य १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांच्या याचिका न्यायालयाने मंजूर केल्या.धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाईउच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात संचालक मंडळांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास अंतरिम मनाई करण्यात आली आहे. त्यांनी केवळ कर्मचार्यांच्या वेतनाशिवाय अन्य कोणताही आर्थिक व्यवहाराचा निर्णय घेऊ नये. तसेच निर्णय घेणे खूपच गरजेचे असेल, तर त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी अर्ज करावा आणि उपनिबंधकांनी अर्ज मंजूर केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.