‘मौखिक तलाक मुस्लिम सोडतील’

By Admin | Updated: April 12, 2017 00:23 IST2017-04-12T00:23:43+5:302017-04-12T00:23:43+5:30

त्रिवार ‘तलाक’ उच्चारून घटस्फोट देण्याची प्रथा मुस्लिम समाज आपणहून सोडून देईल व त्यामुळे यात सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज पडणार नाही, असे शिया मुस्लिम

'Oral divorce leaves Muslim' | ‘मौखिक तलाक मुस्लिम सोडतील’

‘मौखिक तलाक मुस्लिम सोडतील’

बिजनौर : त्रिवार ‘तलाक’ उच्चारून घटस्फोट देण्याची प्रथा मुस्लिम समाज आपणहून सोडून देईल व त्यामुळे यात सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज पडणार नाही, असे शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष कलबे सादिक यांनी येथे सांगितले.
समाजात रुढ झालेली ही तलाकची प्रथा महिलांवर अन्याय करणारी आहे. पण हा व्यक्तिगत विषय असल्याने समाज येत्या वर्ष-दीड वर्षात आपणहून या प्रथेचा त्याग करेल, असे ते म्हणाले. इस्लामच्या धर्मग्रंथांमध्ये बीफ खावे असे कुठेही सांगितले नाही. त्यामुळे मुस्लिमांनी ते खाऊ नये,असे सांगून कलबे सादिक म्हणाले की, सरकार गोवंश हत्याबंदी व बीफ खाण्यास प्रतिबंध करणारा कायदा देशत करू इच्छित असेल तर मुस्लिम त्याचे स्वागच करतील. मात्र गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया थांबायला हव्यात, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

महिलांच्या प्रतिष्ठेवर परिणाम : तीनवेळा तलाक, निकाह हलाला व बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे मुस्लिम महिलांचा सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम होतो व घटनेने त्यांना जे मूलभूत अधिकार दिले ते नाकारले जातात, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

Web Title: 'Oral divorce leaves Muslim'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.