महिलेवर अत्याचार; तिघांविरुध्द गुन्हा

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:00+5:302015-03-25T21:10:00+5:30

पाथडी(अहमदनगर): मुलीला उपचारासाठी चांगल्या दवाखान्यात घेवून जावू असे सांगून सुपा येथे तालुक्यातील एका महिलेला नेवून तिचा विनयभंग करून अत्याचार करून केल्याची घटना १२ मार्च २०१५ रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Oppression of women; Crime against triple | महिलेवर अत्याचार; तिघांविरुध्द गुन्हा

महिलेवर अत्याचार; तिघांविरुध्द गुन्हा

थडी(अहमदनगर): मुलीला उपचारासाठी चांगल्या दवाखान्यात घेवून जावू असे सांगून सुपा येथे तालुक्यातील एका महिलेला नेवून तिचा विनयभंग करून अत्याचार करून केल्याची घटना १२ मार्च २०१५ रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांची माहिती अशी की, तालुक्यातील पूर्व भागातील एका गावातील महिलेची मुलगी सतत आजारी असते. पागोरी पिंपळगाव येथील पंढरीनाथ अर्जुन दराडे, गोरक्ष अर्जुन दराडे, अर्जुन आसाराम दराडे यांनी या महिलेला तुझ्या मुलीला उपचारासाठी चांगल्या दवाखान्यात घेवून जावू असे सांगून तिला सुपा (ता. पारनेर) येथे घेवून गेले. तेथे पंढरीनाथ दराडे यांनी सदर महिलेवर अत्याचार केला तर गोरक्ष दराडे व अर्जुन दराडे यांनी तिच्याशी अंगलट करून छेडछाड केली. सदर महिलेला खोलीत कोंडून ठेवून कोणाला काही सांगीतले तर तुला व तुझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सदर महिलेने मंगळवारी रात्री उशीरा पोलीसात तक्रार केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करून सुपा पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Oppression of women; Crime against triple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.