शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मिशन 2024 साठी विरोधकांचे 'अब तक 26', बेंगळुरूतील बैठकीसाठी काँग्रेसचे आणखी दोन पक्षांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 03:03 IST

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अपना दल (कमेरावादी) आणि तामिळनाडूतील एका प्रादेशिक पक्षाला हे निमंत्रण पाठविले आहे. 

पुढील वर्षात, अर्थात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाआघाडी स्थापन करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या विरोधी पक्षांची पुढची बैठक 17 आणि 18 जुलै रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. तत्पूर्वी, काँग्रेसने आणखी दोन छोट्या पक्षांना या बैठकीत सहभागी होण्यासंदर्भात निमंत्रण पाठविले आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अपना दल (कमेरावादी) आणि तामिळनाडूतील एका प्रादेशिक पक्षाला हे निमंत्रण पाठविले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपना दल (के)च्या प्रमुख कृष्णा पटेलही विरोधकांच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. याच बरोबर, बेंगळुरूत होणाऱ्या या बैठकिसाठी  निमंत्रित पक्षांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे. यापूर्वी 23 जून रोजी बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनावरून ही बैठक झाली होती.

पहिल्या बैठकीत 30 हून अधिक नेते सहभागी झाले होते - या बैठकीसाठी एकूण 16 पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. यांपैकी 15 पक्षांनी या बैठकीला हजेरी लावली. कौटुंबिक कार्यक्रमामुळे आरएलडीचे जयंत चौधरी बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. या पक्षांच्या 30 हून अधिक नेत्यांनी निवडणुकांबाबत समान रणनीतीसंदर्भात चर्चा केली होती.

दुसरी बैठक काँग्रेसच्या नेतृत्वात -काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची दुसरी बैठक होत आहे. ही बैठक आधी शिमल्यात होणार होती, मात्र खराब हवामानामुळे जागा बदलण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 17 जुलै रोजी बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांसाठी डिनरचे आयोजन केले आहे. तर 18 जुलैला बैठक होईल. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. या शिवाय ममता बॅनर्जीहीया बैठकीत सहभागी होतील.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक