शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 00:27 IST

- शीलेश शर्मा  नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी काँग्रेसने संयुक्त उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया ...

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी काँग्रेसने संयुक्त उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला संसदीय कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या दहा सदस्यांशिवाय मल्लिकार्जुन खडगे, ए. के. अ‍ॅन्टोनी, राहुल गांधी, रवनीत बिट्टू यांच्यासह अन्य नेते व खासदारही उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. मोदी यांंना खोटे बोलण्याऐवजी वस्तुस्थिती ध्यानात घेऊन बोलण्यास भाग पाडण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक व्हावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. बेरोजगारी हा सर्वांत गंभीर मुद्दा आहे. काँग्रेसच्या खासदारांनी आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत आणि संसदेबाहेर सरकारवर चौफेर हल्ला करावा. चीनच्या घुसखोरीवरूनही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले, असे सूत्रांनी सांगितले. मित्र पक्षांसोबत योग्य समन्वय राखण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

बैठकीत ठरलेल्या रणनीतीनुसार काँग्रेस मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकारने जारी केलेल्या अध्यादेशांना विरोध करील. कोरोनाच्या साथीदरम्यान जनतेला वाऱ्यावर सोडल्याबद्दल काँग्रेस संसदेत सरकारवर निशाणा साधेल. याशिवाय कोलमडलेली अर्थव्यवस्था, लॉकडाऊनसह इतर महत्त्वाचे मुद्देही उपस्थित करणार आहे. सरकारने आडकाठी केल्यास गोंधळ घालण्याचीही तयारी काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाIndiaभारत