शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अभिनंदन प्रकरणावेळी विरोधकांनी कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 10:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राइक आणि अभिनंदन प्रकरणावरून विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे.

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राइक आणि अभिनंदन प्रकरणावरून विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. अभिनंदन आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय मुद्दा बनवण्याचा डाव विरोधकांनी आखला होता. मात्र अभिनंदनच्या सुटकेची घोषणा झाल्याने त्यांचे प्रयत्न फोल ठरले, असा दावा मोदींनी केला आहे. रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''जे आपल्या देशाच्या पंतप्रधानावर संशय घेतात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे कौतुक करतात, त्यांना ओळखले पाहिजे. जेव्हा अभिनंदन प्रकरण घडले तेव्हा देशातील सर्व राजकीय पक्षांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडणाऱ्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे, असे एकजुटीने सांगण्याची गरज होती. मात्र ते सोडून या मंडळीने अभिनंदन परत कधी येईल, असा धोशा सुरू केला. त्या रात्री मेणबत्ती मोर्चा आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय  मुद्दा बवण्याची योजनाही त्यांनी आखली होती. मात्र त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांचा डाव फसला.'' यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याच सल्ला दिला. ''पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडावा अशी भारताची मागणी आहे. इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे. तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींनाही पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे,'' अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.'' यापूर्वी जनता मोदीला ओळखत नव्हती. मात्र आता देश मोदीला ओळखतो. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नांवर देशाला माझी भूमिका माहिती आहे. त्यामुळे देशातील कुठलीही व्यक्ती माझ्या देशभक्तीवर शंका घेत नाही. हे माझे शब्द नाही. तर माझे जीवन बोलते,''  असेही मोदींनी यावेळी सांगितले.  यावेळी डीआरडीओने परवाच घेतलेल्या उपग्रहविरोधी मिशन शक्तीवरूनही मोदींनी विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले की, A-SAT बाबत काँग्रेसकडे सामान्य ज्ञानाचा अभाव आहे.  A-SAT ची चाचणी घेण्यापूर्वी दीर्घ योजना आखली गेली होती. निवडणुकीच्या काळात सरकार गंभीर प्रश्नांबाबत बोलू शकत नाही का? सध्या विरोधी पक्षांना अज्ञानाने घेरले आहे.  30 वर्षांच्या अस्थिरतेनंतर देशाला आता स्थिरता हवी आहे.''  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPoliticsराजकारणIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक