मौलाली चौकातील टॉवरला विरोध

By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:33+5:302015-08-11T00:03:33+5:30

सोलापूर : मौलाली चौकातील खासगी मिळकतीवर बसविण्यात येणार्‍या मोबाईल टॉवरला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. मोहननगरातील प्लॉट क्र. २८४ मध्ये रिलायन्स कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी विरोध करूनसुद्धा महापालिकेने टॉवर उभारण्यास परवानगी दिली कशी असा सवाल परिसरातील महिलांनी उपस्थित केला आहे. महापौर कार्यालयात याबाबत निवेदन देण्यात आले.

Opposition to the tower of Maulali Chowk | मौलाली चौकातील टॉवरला विरोध

मौलाली चौकातील टॉवरला विरोध

लापूर : मौलाली चौकातील खासगी मिळकतीवर बसविण्यात येणार्‍या मोबाईल टॉवरला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. मोहननगरातील प्लॉट क्र. २८४ मध्ये रिलायन्स कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी विरोध करूनसुद्धा महापालिकेने टॉवर उभारण्यास परवानगी दिली कशी असा सवाल परिसरातील महिलांनी उपस्थित केला आहे. महापौर कार्यालयात याबाबत निवेदन देण्यात आले.
एकरुख तलावातील गाळ काढण्याची मागणी
सोलापूर : सोलापूर शहर स्मार्ट होण्यासाठी एकरुख तलावातील गाळ काढण्यात यावा अशी मागणी स्व. वसंतराव भागवतराव स्मृती संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ बेंद्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. १८७१ मध्ये ब्रिटिशांनी हा तलाव बांधला. तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. गाळ काढल्यास सोलापूरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल याशिवाय तलाव परिसरात पिकनिक स्पॉट विकसित करणे शक्य होणार आहे. निवेदन देताना संस्थेचे सचिव संतोष कुलकर्णी, उपाध्यप रोहिणी तडवळकर, संजय ननवरे उपस्थित होते.

Web Title: Opposition to the tower of Maulali Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.