शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गौतम अदानींवरून विरोधी पक्षांमध्ये फूट, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:03 IST

Gautam Adani : अदानी प्रकरणावरून संसदेत जोरदार गदारोळ होत आहे. दरम्यान, आता अदानी प्रकरणावरून विरोधी पक्षांमध्ये फूट पडताना दिसत आहे.

हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडालेली आहे. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप करत विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. अदानी प्रकरणावरून संसदेत जोरदार गदारोळ होत आहे. दरम्यान, आता अदानी प्रकरणावरून विरोधी पक्षांमध्ये फूट पडताना दिसत आहे.

अदानी विवाद प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाळलेल्या मौनाबद्दल काँग्रेसने सवाल उपस्थित केले आहेत. ममता बॅनर्जी यांना या प्रकरणात गप्प राहण्यास सांगण्यात आले आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. 

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मला वाटते की, ममता बॅनर्जी आणि अदानी यांच्यात चांगले संबंध आहेत. कारण बंगालमधील ताजपूर येथे एक बंदर बांधले जात आहे. अदानी आमि मोदींसोबत ममता बॅनर्जी यांच्या संबंधांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे मोदींविरोधात त्या फार काही बोलत नाहीत. बंगालमध्ये आम्ही त्यांना फायटर म्हणून ओळखत होतो. मात्र आता त्या शांत झाल्या आहेत.  

गौतम अदानी हे ताजपूर येथे बंदर बांधत आहेत. याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत. ममता बॅनर्जींनी अदानी समुहाला हरप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.  त्यामुळे अदानी यांच्या हितसंबंधांना बाधा येईल, असं ममता बॅनर्जी काहीही करणार नाहीत, असा दावाही अधीर रंजन चौधरी यांनी केला. कदाचित त्यांना अदानी आणि केंद्र सरकारविरोधात गप्प राहण्याबाबत सूचना मिळाल्या असाव्यात, असेही अधीर रंजन चौधरी म्हणाले.  

काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याकडून संसदेच्या कामकाजामध्ये अडथळे आणले जात आहेत. मात्र या प्रकरणात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. तृणमूल काँग्रेस विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेला नाही. मात्र तृणमूल काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, तसेच या आंदोलनात सहभाग घेतला होता.  

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीParliamentसंसदcongressकाँग्रेस