शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:44 IST

राम मंदिरासाठी संघ आणि भाजपा कटिबद्ध असल्याचं भागवत म्हणाले

हरिद्वार: देशातील बहुसंख्य समाज भगवान रामाची पूजा करत असल्यानं विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघ आणि भाजपा अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहेत. मात्र काही गोष्टींसाठी वेळ लागतो, असं भागवत म्हणाले. पतंजली योगपीठात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक सरकारच्या काही सीमा असतात, असं मोहन भागवत यांनी म्हटलं. 'प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादांमध्ये राहूनच त्यांना काम करावं लागतं. मात्र संत आणि पुरोहित यांना अशा कोणत्याही मर्यादा नसतात,' असं सरसंघचालक म्हणाले. 'विरोधी पक्षदेखील उघडपणे अयोध्येतील राम मंदिराला विरोध करु शकत नाही. कारण देशातील बहुसंख्य समाज हा भगवान रामाची पूजा करतो, याची त्यांना कल्पना आहे. मात्र काही गोष्टींसाठी वेळ लागतो. राम मंदिराची उभारणी नक्की होईल. पण त्यासाठी काही अवधी लागेल,' असं भागवत यांनी म्हटलं. यावेळी सरसंघचालकांनी सरकारच्या मर्यादांवरदेखील भाष्य केलं. 'प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. त्यामध्ये राहून सरकारचं काम चालतं. चांगलं काम करणारा पक्ष सत्तेत असायला हवा. कोण सत्तेत आहे, हे अतिशय महत्त्वाचं असतं,' अशा शब्दांमध्ये भागवत यांनी अप्रत्यक्षपणे सरकारचं समर्थन केलं. यावेळी रामदेव बाबा यांनी संत-महंत मंत्र्यांपेक्षा अधिक सक्षम असल्याचं प्रतिपादन केलं. 'ज्या ठिकाणी मंत्री, धनाढ्य व्यक्ती अपयशी ठरतात, त्याठिकाणी संत-महंतांना यश मिळतं. अनेकदा हे दिसून आलं आहे,' असं रामदेव बाबांनी म्हटलं.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा