शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदींविरोधात ‘वज्रमूठ’साठी विरोधक सरसावले; दिल्लीत बैठकांना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 06:30 IST

नितीश कुमार, तेजस्वी यांनी घेतली खरगे, राहुल गांधींची भेट 

- आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांची भेट घेतली. महिनाभरातील या नेत्यांची ही दुसरी बैठक आहे. या बैठकीत पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीची तारीख व रणनीतीबाबत चर्चा झाली. आजच्या चर्चेनंतर विरोधकांच्या ऐक्याबाबत पाटण्यात होणाऱ्या बैठकीची तारीख लवकरच जाहीर होऊ शकते. या बैठकीसोबत एक जाहीर सभाही घेण्याचीही तयारी सुरू आहे. 

कर्नाटक निवडणुकीमुळे काँग्रेस पक्षासोबत बैठकीची तारीख व रणनीतीबाबत चर्चा होऊ शकली नव्हती. उद्धव ठाकरे यांच्याशी नितीशकुमार व तेजस्वी यांची पाटण्यातील बैठकीबाबत चर्चा झाली तेव्हा मी या बैठकीला नक्कीच उपस्थित राहीन, असे ठाकरे त्यांना म्हणाले होते. 

केजरीवाल यांच्याशी चर्चाया बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच नितीश कुमार यांना हिरवा कंदील दाखवला होता. 

नितीश कुमार व तेजस्वी यादव यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासोबतची त्यांची बैठक रविवारी होणार होती. राहुल यांच्याकडे वेळ होता, पण काँग्रेस अध्यक्ष खरगे कर्नाटकात व्यग्र होते. त्यामुळे सोमवारी ही बैठक झाली.

सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे : शरद पवार‘मी निवडणूक लढविणार नाही. मात्र, मला सर्व विराेधकांना एकत्र आणायचे आहे. जनतेने साथ आणि शक्ती दिली, तर त्यातून आम्ही पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवू. बंगळुरूला गेलाे हाेतो तेथे विविध पक्षांच्या विराेधी पक्षातील नेत्यांची भेट झाली. एकत्र येऊन पुढील धाेरण ठरविणार आहोत,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा काेणी किती लढवायच्या याबाबत चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. तिन्ही पक्षांच्या दाेन सदस्यांनी साेबत बसून चर्चा करावी. काही अडचण आलीच, तर मी, उद्धव ठाकरे, साेनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आम्ही मिळून मार्ग काढू. माध्यमे याबाबत विपर्यास करीत आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधी