शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा केंद्राला पाठिंबा; मागास जाती ठरवण्याचा अधिकार राज्यांना मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 07:05 IST

याच अधिवेशनात विधेयक एकमताने होईल मंजूर; १२७व्या घटनादुरुस्तीला विरोध न करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : राज्यांना एखादी जात वा जात समूहाला मागास ठरविण्याचा अधिकार देण्यासाठी मांडण्यात येणाऱ्या १२७व्या घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय संसदेतील सर्व विरोधी पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे हे विधेयक एकमताने मंजूर होण्यात कोणतीही अडचण राहिलेली नाही. १०२वी घटनादुरुस्ती केल्यानंतर राज्यांना एखादी जात वा जात समूहाला मागास ठरविण्याचा अधिकार राहिलेला नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले होते. आता या १०२व्या घटनादुरुस्तीत बदल सुचविणारे १२७वे घटनादुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने तातडीने तयार केले असून ते संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.पेगॅसस, नवे कृषी कायदे, शेतकऱ्यांचे आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज रोखून धरले होते; मात्र त्यानंतर काही आठवड्यांनी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांची सोमवारी दिल्लीमध्ये बैठक झाली. त्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, माकप, समाजवादी पक्ष, राजद, भाकप, नॅशनल काॅन्फरन्स आदी विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. ही बैठक राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी आयोजित केली होती. राज्यांना एखादी जात वा जात समूहाला मागास ठरविण्याचा अधिकार देण्यासाठी मांडण्यात येणाऱ्या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात संमती दिली होती व सोमवारी ते लोकसभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आले.‘आरक्षण मर्यादेमुळे अडचणी कायम’मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खासदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते की, एखादी जात वा जात समूहाला मागास ठरविण्याचा अधिकार कोणाकडेही असला तरी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम राहिल्यास मराठा आरक्षण तसेच देशातील बहुतांश राज्यांना नवीन आरक्षण देणे शक्य होणार नाही.विधेयक त्वरित मंजूर करा : फडणवीसमराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून १२७वे घटनादुरुस्ती विधेयक लवकरात लवकर संमत करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. राज्यांना एखादी जात वा जात समूहाला मागास ठरविण्याचा अधिकार पुन्हा परत मिळणे आवश्यक आहे, असेही फडणवीस म्हणाले.पेगॅससच्या मुद्द्यावर यापुढेही विरोधकांचा संघर्ष कायमकाँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, जनतेच्या हितासाठी विरोधी पक्षांनी विधेयकाला पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. या विधेयकावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे; मात्र हे विधेयक वगळता पेगॅसससारख्या बाकी मुद्द्यांवर मोदी सरकारशी संघर्ष सुरूच राहणार आहे.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस