विरोधकांवर ममता बॅनर्जींचा अश्लील शब्दांत हल्ला
By Admin | Updated: December 4, 2014 12:57 IST2014-12-04T12:39:02+5:302014-12-04T12:57:11+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जीभ पुन्हा एकदा घसरली असून विरोधकांवर अश्लील शब्दांत टीका केल्याने ममताबाई चर्चेत आल्या आहेत.

विरोधकांवर ममता बॅनर्जींचा अश्लील शब्दांत हल्ला
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ४ - बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जीभ पुन्हा एकदा घसरली असून अत्यंत खालच्या थरातील शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
जलपाईगुडी येथील एका सभेत ममता बॅनर्जींनी बंगालमधील ग्रामीण भाषेतील म्हणीचा आधार घेतला. विरोधकांवर टीका करताना ममतादिदींनी अत्यंत आक्षेपार्ह शब्दच वापरले. ममतांचा रोख कोण कोणाकडे होता हे नेमके स्पष्ट झाले नसले तरीही त्यांनी माकपावर हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दार्जिलिंग व जंगलमहल येथे शांततेचे राज्य आहे, हे त्यांना बघवत नाही का? त्यांनी स्वत: तर काहीच केले नाही आणि जे लोक बदल घडवू इच्छित आहेत "उनके पिछवाडे में बांस दिया जा रहा है," असे वक्तव्य करत ममतांनी त्यांच्यावर निशाणा साधला. यापूर्वीही ममता यांनी अनेक वेळा बेताल वक्तव्ये केली आहेत.