शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

INDIAने बंगळुरुतील बैठकीत काय ठरवले? लोकसभेसाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 19:27 IST

Opposition Parties Meet in Bengaluru: विरोधकांनी नव्या नावासह अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतल्याचे सांगितले जात आहे.

Opposition Parties Meet in Bengaluru: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी विरोधकांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून २४ विरोधी पक्षांची एक बैठक बंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच विरोधी पक्षांच्या आघाडीला नवे नाव देण्यात आले आहे. या बैठकीनंतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि एनडीएवर घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळाले.

बंगळुरुत पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीत आघाडीचे नाव निश्चित करण्यासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बंगळुरूतील विरोधी पक्षांच्या बैठकीत २६ पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. विरोधकांच्या या नव्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असे नाव दिले असल्याची घोषणा करण्यात आली. तर, जागा वाटप आणि इतर मुद्यांसाठी ११ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. 

लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी विरोधी ऐक्याची ही बैठक महत्त्वाची

देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी विरोधी ऐक्याची ही बैठक महत्त्वाची आहे. या बैठकीत सर्वानुमते इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुसिव्ह अलायन्स हे नाव आघाडीला द्यायचे ठरले आहे. आधी पंतप्रधान मोदी मित्रपक्षांसोबत बोलतही नव्हते.  मात्र आता एकेकाला गोळा करतायत. विरोधकांच्या एकजुटीचा त्यांनी धसका घेतला आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. पुढील बैठकीत समन्वय समितीची बैठक होणार आहे. या समितीत ११ सदस्य असणार आहेत. त्यातील नावांबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे खरगे यांनी सांगितले. 

दरम्यान, एनडीए आणि इंडिया यांच्यात लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि India यांच्यात लढत आहे. त्यांची विचारधारा आणि भारत यांच्यातील संघर्ष आहे. आम्ही एक कृती आराखडा तयार करू आणि एकत्रितपणे आम्ही देशात काय करू इच्छितो हे सांगणार आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशातील विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. आता दुसरी दोन दिवसीय बैठक बंगळूरु येथे संपन्न झाली. 

 

टॅग्स :Bengaluruबेंगळूरcongressकाँग्रेस