शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्री असताना लिहिलेल्या पत्राचा विपर्यास, विरोधकांनी ते नीट वाचावे, शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 05:07 IST

Sharad Pawar News : कृषिमंत्री असताना लिहिलेल्या पत्रात किमान एमपीएमसीचा उल्लेख आहे. ते पत्र विरोधकांनी नीट वाचावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले.

नवी दिल्ली : कृषिमंत्री असताना लिहिलेल्या पत्रात किमान एमपीएमसीचा उल्लेख आहे. ते पत्र विरोधकांनी नीट वाचावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी विरोधकांना सुनावले. त्या पत्राचा संदर्भ देत कृषी कायद्याला पवारांचा पाठिंबा असल्याचा प्रचार सोशल मीडियावर सुरू आहे. त्यावर स्वतः पवार यांनी दिल्लीत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. महत्त्वाचा मुद्दा भरकटवण्यासाठी पत्राचा आधार घेतला जात असून, त्याला अति महत्त्व देऊ नये, असे ते म्हणाले.बुधवारी सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. अर्धा तास बैठक चालली. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘विरोधकांनी पत्र नीट वाचावे. वारंवार पत्रावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर पवार चांगलेच संतापले. कृषी कायद्यावर चर्चा झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणार नाही, असे त्यांनी म्हटले. तरीही काही पत्रकार त्यांना पत्र, शेतकरी आंदोलनावरच प्रश्न विचारत राहिले. त्यावर संतप्त पवार म्हणाले, तुम्ही सारे बाहेर उभे होता ते पाहून मला बरे वाटले नाही, म्हणून मी तुम्हाला बोलावले. प्रश्नाचे एकदा उत्तर दिल्यावरही तुम्ही मला एकच प्रश्न वारंवार विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला बोलावूनच चूक केली. यापुढे तुम्हाला बोलावणार नाही, अशा शब्दांत पवारांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली. 

केंद्रीय कृषी कायद्यात एपीएमसीचा उल्लेख नाहीमाझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असा उल्लेख आहे. केंद्राचे जे कृषी कायदे आहेत त्यात एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी