शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात ज्यांचं कौतुक होतंय, त्यांच्यावरच विरोधक टीका करताहेत; जावडेकरांचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 18:33 IST

कधी म्हणतात, लॉकडाऊन योग्य वेळी लागू झाले नाही. तर लॉकडाऊनमधून सूट दिल्यावरही त्यांना पोटशूळ उठतो.

नवी दिल्लीः ज्यांच्या कामाचं संपूर्ण जग कौतुक करतो, त्यांच्यावरच विरोधक त्यावर टीका करतात, असं म्हणत जावडेकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आजतकच्या ई-अजेंडा कार्यक्रमात ते बोलत होते. लॉकडाऊनचा निर्णय नियोजन न करता घेण्यात आला, असा विरोधकांकडून होत असलेल्या आरोपासंदर्भात विचारले असता, जावडेकर म्हणाले, जर आज लॉकडाऊन नसते तर संक्रमित रुग्णांची संख्या 50 लाखांच्या घरात गेली असती. ही एक संकटाची परिस्थिती आहे, तरीही या काळात आपण केलेल्या कार्याचे संपूर्ण जगाने कौतुक केले आहे. पण आपले विरोधक फक्त टीका करण्यात धन्यता मानत आहेत. कधी म्हणतात, लॉकडाऊन योग्य वेळी लागू झाले नाही. तर लॉकडाऊनमधून सूट दिल्यावरही त्यांना पोटशूळ उठतो.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा योग्य वेळी निर्णय घेतला. जनतेला अपील केले. त्यांच्या या निर्णयाचे जगाने कौतुक केले. आमचे सरकार सतत काम करत आहे. कोरोनाचे संकट जगभर आहे. कोरोनाची लोकांमध्ये सर्वप्रथम चर्चा केली जात आहे. मोदीजींनी यापूर्वी कोरोनाचं संकट ओळखलं होतं, म्हणूनच त्या संकटाला आपण योग्य पद्धतीनं सामोरे गेलो आहोत. प्रकाश जावडेकर म्हणाले की, चार महिन्यांपूर्वी जेव्हा कोरोना आला, तेव्हा देशात फक्त प्रयोगशाळा होती. आज आपल्याकडे 100 पेक्षा जास्त प्रयोगशाळा आहेत. आज आपल्याकडे 800 कोरोना समर्पित रुग्णालये आहेत. तसेच भारतानं आत्मनिर्भर होत व्हेंटिलेटर बनविण्यास सुरुवात केली आहे,  पीपीई किट्स आम्ही बनवत आहोत. जगाच्या तुलनेत भारताचे झालेले नुकसान फारच कमी आहे. मोदींनी केलेल्या आवाहनाला जनतेने पाठिंबा दर्शविला. मोदींच्या मेक इन इंडिया प्रोग्रामला चालना मिळाली. सगळे जण एकत्र आले आणि शेतीपासून संरक्षणापर्यंत बरीच सुधारणा झाली. हे सर्व बदल कोरोना विषाणूमुळे झाल्याचंही जावडेकरांनी अधोरेखित केलं. 

हेही वाचा!

CoronaVirus: स्मशानात मृतदेहाला पाणी पाजणं पडलं महागात; अंत्यविधीला गेलेल्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग 

CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार

जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार 

CoronaVirus: विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ठोस तोडगा काढण्याचे निर्देश

CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrakash Javadekarप्रकाश जावडेकर