शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Opinion Poll: ...तर यूपीए ठरणार एनडीएपेक्षा वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 22:21 IST

काँग्रेसने देशभरात प्रादेशिक पक्षांशी आघाड्या केल्यास त्यांना अडीचशेच्या आसपास जाता येईल. तर सध्या सव्वा तीनशेजवळ असणारा एनडीए सव्वा दोनशेपर्यंत येईल.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसनं देशभरात विविध पक्षांसोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला जवळपास सर्व राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसने देशभरात प्रादेशिक पक्षांशी आघाड्या केल्यास त्यांना अडीचशेच्या आसपास जाता येईल. तर सध्या सव्वा तीनशेजवळ असणारा एनडीए सव्वा दोनशेपर्यंत येईल.कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यावेळी व्यासपीठावर सोबत असलेल्या पक्षांनी आगामी निवडणुकीतही साथ द्यावी, यासाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसच्या या प्रयत्नांना यश आल्यास आणि प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी झाल्यास त्याचा मोठा फायदा पक्षाला होईल. राज्यात राष्ट्रवादी, उत्तर प्रदेशात महाआघाडीची साथ मिळाल्यास यूपीए 244 पर्यंत मजल मारू शकते. मात्र यासाठी काँग्रेसला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांसोबतच आसाम, बिहार, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्येही प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करावी लागेल.काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत हातमिळवणी केल्यास त्याचा मोठा फटका भाजपाप्रणित एनडीएला बसेल, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसने देशभरात छोट्या पक्षांशी आघाड्या केल्यास यूपीएला 244 जागा मिळतील. मात्र एनडीएच्या जागा 228 वर येतील. सत्ता स्थापनेसाठी 272 जागा आवश्यक असतात. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सत्ता स्थापनेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस