पाटणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरनेसोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला जो आता जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रुग्णालयाच्या खिडकीजवळील छतावरील प्लास्टर पडताना दिसत आहे. सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळल्याची माहिती डॉक्टरने दिली. या घटनेत डॉक्टर जखमी झाला.
हा व्हिडीओ प्रसिद्ध सर्जन @Lap_surgeon यांनी देखील पोस्ट केला होता. "आमची जीर्ण #आरोग्यसेवा व्यवस्था! हे बिहारच्या पटना येथील पीएमसीएचमधील ऑपरेशन थिएटर (OT) आहे. ऑपरेशन दरम्यान, छत कोसळलं आणि माती पडू लागली, ज्यामध्ये डॉक्टर जखमी झाला. सरकारचे लक्ष Quantity पेक्षा Quality वर असलं पाहिजे" असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये ऑपरेशन थिएटरच्या आत खिडकीजवळील छतावरून प्लास्टर पडताना दिसत आहे. व्हिडीओ अपलोड करणाऱ्या डॉक्टरने त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, तो आत सर्जरी करत असताना प्लास्टर पडलं. त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या नर्स या दुर्घटनेतून थोडक्यात वावल्या.
"आज, PMCH मध्ये सर्जरी करत असताना, ऑपरेशन थिएटरचं छत माझ्या मागच्या बाजुला कोसळलं. माझ्या पायाला दुखापत झाली, तर जवळ उभ्या असलेल्या नर्स थोडक्यात वाचल्या. अशा वातावरणात कोण कसं काम करू शकतं? जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रुग्णालय असं कसं बांधलं जाऊ शकतं?" असं डॉक्टरने सांगितलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
Web Summary : A doctor in Patna shared a video of plaster falling from an operation theatre ceiling during surgery. The incident injured the doctor. Concerns are raised about the quality of healthcare infrastructure.
Web Summary : पटना में एक डॉक्टर ने सर्जरी के दौरान ऑपरेशन थिएटर की छत से प्लास्टर गिरने का वीडियो साझा किया। घटना में डॉक्टर घायल हो गए। स्वास्थ्य सेवा बुनियादी ढांचे की गुणवत्ता पर चिंता जताई गई है।