शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 19:55 IST

Indian Aemed Force Uniform: कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी आज ऑपरेशन सिंदूरबाबत महत्वाची माहिती दिली.

Indian Armed Force Uniform: भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी गुरुवारी(8 मे) नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली. विशेष म्हणजे, आजच्या पत्रकार परिषदेत दोन्ही महिला अधिकारी सैन्याच्या लढाऊ गणवेशात दिसल्या. याद्वारे त्यांनी देशाच्या लष्करी सामर्थ्याचे आणि महिला शक्तीचे दर्शन घडवले. तर, कालच्या पत्रकार परिषदेत त्या दोघी सामान्य सैन्य गणवेशात आल्या होत्या.

कर्नल सोफिया कुरेशीगुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी असलेल्या कर्नल कुरेशी या भारतीय सैन्याच्या सिग्नल कॉर्प्समध्ये अधिकारी आहेत. त्यांनी 1997 मध्ये एमएस विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए) मध्ये त्यांची नियुक्ती झाली. 2006 मध्ये त्या काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सहभागी झाल्या. बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय सैन्याच्या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

विंग कमांडर व्योमिका सिंगभारतीय हवाई दलातील एक कुशल हेलिकॉप्टर पायलट असलेल्या व्योमिका सिंह यांची 2004 मध्ये नियुक्ती झाली. 2017 मध्ये त्यांना विंग कमांडर पदावर बढती मिळाली. त्यांनी चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर उडवले आहेत. अनेक उच्च-जोखीम असलेल्या उड्डाण मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. 2019 मध्ये त्यांना फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरुपी कमिशन मिळाले.

लढाऊ गणवेशाचे महत्त्वपत्रकार परिषदेत दोन्ही अधिकाऱ्यांनी डिजिटल कॅमफ्लाज पॅटर्नसह लढाऊ गणवेश परिधान केला होता, जो भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या आधुनिक गणवेशाचा भाग आहे. लष्कराच्या गणवेशात हिरवा, तपकिरी आणि काळा रंग मिसळलेला असतो, तर हवाई दलाच्या गणवेशात निळा, राखाडी आणि हिरवा रंग असतो. हा गणवेश केवळ युद्धभूमीवर कार्यक्षमता आणि लपण्याची क्षमता प्रदान करत नाही, तर लष्करी अभिमान आणि शिस्तीचे प्रतीक म्हणून देखील काम करतो.

भारतीय सैन्याचा सामान्य युद्ध गणवेशभारतीय सैन्याचा लढाऊ गणवेश वेगवेगळ्या भौगोलिक आणि लढाऊ परिस्थितीनुसार अनुकूल आहे. लष्कराने त्यांच्या गणवेशांना अधिक आधुनिक आणि कार्यात्मक बनवण्यासाठी त्यात अनेक बदल केले आहेत. 2002 मध्ये भारतीय सैन्याने एक नवीन डिजिटल पॅटर्नचा लढाऊ गणवेश सादर केला, जो जुन्या गणवेशापेक्षा अधिक प्रभावी आणि बहुमुखी आहे.

नवीन डिजिटल कॅमफ्लाज बॅटल युनिफॉर्म

  • डिझाइन: नवीन गणवेशात डिजिटल कॅमफ्लाज पॅटर्न आहे, ज्यामध्ये हिरवा, तपकिरी आणि काळा रंगांचा समावेश आहे.
  • कापड: हा गणवेश कापूस आणि पॉलिस्टरच्या उच्च दर्जाच्या मिश्रणापासून बनवला आहे, ज्यामुळे तो हलका, टिकाऊ बनतो. हा दीर्घकाळाच्या युद्ध परिस्थितीत सैनिकांना आराम देते.
  • एर्गोनॉमिक डिझाइन: सैनिकांची हालचाल आणि आराम लक्षात घेऊन गणवेशाची रचना केली आहे. त्यात खांद्यावर आणि कोपरांवर अतिरिक्त पॅडिंग आहे.
  • अनेक खिसे: या गणवेशामध्ये अनेक खिसे असतात, जे दारूगोळा, दळणवळण उपकरणे आणि इतर आवश्यक वस्तू ठेण्यासाठी उपयुक्त असतात.
  • पाणी आणि ज्वाला प्रतिरोधक - काही प्रकारांमध्ये जलरोधक आणि अग्निरोधक गुणधर्म आहेत, जे विविध पर्यावरणीय धोक्यांपासून संरक्षण प्रदान करतात.
  • मॉड्यूलर सिस्टीम: यामुळे सैनिकांना आवश्यकतेनुसार बॉडी आर्मर, टॅक्टिकल आणि हेल्मेट यासारख्या वस्तू जोडता येतात किंवा काढता येतात.
  • वापर: हा गणवेश सर्व प्रकारच्या, मग ते जम्मू आणि काश्मीरचे बर्फाळ पर्वत असोत, राजस्थानचे वाळवंट असोत किंवा ईशान्येकडील घनदाट जंगले असोत, सर्व भूप्रदेशात वापरण्यासाठी योग्य आहे.
  • निर्मिती: नवीन गणवेश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) च्या सहकार्याने डिझाइन करण्यात आला आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत हे स्वदेशी पद्धतीने तयार केले जातात.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवान