शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'...तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते', राजनाथ सिंह यांचा INS विक्रांतवरुन मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:48 IST

Operation Sindoor: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज INS विक्रांतवरुन पाकिस्तानला थेट इशारा दिला.

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारेपाकिस्तानला त्यांच्याच शब्दात धडा शिकवला. या ऑपरेशनमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. संरक्षण मंत्री आज नौदलाचे लढाऊ जहाज आयएनएस विक्रांतवर गेले होते. यावेळी त्यांनी नौदल अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नौदलाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. जर पाकिस्तानने काही चूक केली तर यावेळी त्याला सावरण्याची संधीही मिळणार नाही. आमचे नौदल त्सुनामी आणू शकते. पाकिस्तानला असे उत्तर देऊ की, त्याने कधी विचारही केला नसेल. पाकिस्तान वारंवार चर्चेचा प्रस्ताव देत आहे. कालच पाकिस्तानी पंतप्रधान चर्चेबद्दल बोलले. पण, आमची स्पष्ट भूमिका आहे की, यापुढे फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होणार.

पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते...राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, पाकिस्तानने हाफिज सईद आणि मसूद अझहरला भारताच्या स्वाधीन करावे. हाफिज सईद मुंबई हल्ल्यात सहभागी होता आणि त्याला जबाबदार धरले जाईल. दहशतवादाविरुद्ध आम्ही अशी कारवाई करू, ज्याचा पाकिस्तान विचारही करू शकत नाही. यावेळी जर पाकिस्तानने पुन्हा काही आपल्या कुरापती सुरू केल्या, तर नौदल देखील युद्धात उतरेल अन् मग पाकिस्तानचे काय होईल, हे देवालाच माहिती. 1971 मध्ये जेव्हा नौदल आले होते, तेव्हा पाकिस्तानचे 2 तुकडे झाले होते. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल आले असते, तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते, असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केला. 

पाकिस्तानला भारतीय नौदलाची ताकद ठाऊक आहेसंरक्षणमंत्री पुढे म्हणाले, भारतीय नौदलाने कारवाई केल्याने काय परिणाम होतात, हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक आहे. भारत कुठेही कधीही अन् कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आपल्या सैन्याचे मनोबल डोंगरासारखे मजबूत आहे. आपली बाजून इतकी मजबूत आहे की, पाकिस्तान संपूर्ण जगासमोर विनवणी करत आहे, असेही राजनाथ सिंहा यावेळी म्हणाले. 

इस्लामच्या नावावर हिंसाचार; हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन...सर्वात मोठ्या मुस्लिम देशाने पाकिस्तानला सुनावले

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRajnath Singhराजनाथ सिंहindian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तान