शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
4
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
5
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
6
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
7
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
8
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
9
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
10
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
11
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
12
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
13
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
14
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
15
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
16
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
17
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
18
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
19
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
20
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू

'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:03 IST

Operation Sindoor: पाकिस्तानच्या विनंतीवरुनच भारताने कारवाई थांबवल्याचा पुनरुच्चार जनरल घई यांनी केला.

Operation Sindoor: भारतीय लष्कराचे उपप्रमुख राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. राजधानी दिल्लीत आयोजित चीफ कॉन्क्लेव मध्ये UNPKF देशांच्या लष्कर प्रमुख आणि उच्च लष्करी कमांडर्सच्या उपस्थितीत ऑपरेशन सिंदूरवर ऑडिओ-व्हिडिओ सादरीकरण करण्यात आले. यावेळी जनरल घईंनी संसद हल्ला, उरी, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा सर्वांसमोर आणला.

नौदल तयारीत...

जनरल घईंनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी केवळ लष्कर आणि वायुसेनाच नाही, तर नौदलही अरब सागराच्या मार्गाने हल्ल्यासाठी पूर्णपणे सज्ज होते. जर पाकिस्तानने युद्ध वाढवण्याची हिंमत दाखवली असती, तर परिस्थिती त्यांच्या कल्पनेपेक्षाही भयावह झाली असती. आपल्या सैन्याने पाकिस्तानला उद्ध्वस्त केले असते. पण, पाकिस्तानी डीजीएमओने फोन करुन युद्ध थांबवण्याची विनंती केली होती, त्यामुळेच भारताने कारवाई थांबवली, अशी माहितीही त्यांनी दिली.

नौदलाकडे कोऑर्डिनेट्स होते

नौदलाला पाकिस्तानातील संभाव्य हल्ल्याचे कोऑर्डिनेट्स व माहिती दिली होती. यावेळी जनरल घई यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमधील उद्ध्वस्त झालेले नऊ दहशतवादी अड्डे आणि अकरा हवाई तळांवर झालेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ आणि फोटो सादर केले. ८८ तासांच्या ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमाने, गुप्तचर विमाने आणि वाहतूक विमानांना झालेल्या नुकसानाचीही माहिती देण्यात आली. 

३० हून अधिक देशांचे लष्करप्रमुख सहभागी 

या कार्यक्रमात ३० हून अधिक देशांचे लष्करप्रमुख, उपप्रमुख आणि वरिष्ठ लष्करी कमांडर सहभागी झाले. यात भूतान, बुरुंडी, इथिओपिया, फिजी, फ्रान्स, घाना, कझाकस्तान, किर्गिस्तान, मंगोलिया, पोलंड, श्रीलंका, टांझानिया, युगांडा, उरुग्वे, व्हिएतनाम, अल्जेरिया, आर्मेनिया, बांग्लादेश, ब्राझील, कंबोडिया, इटली, नेपाळ, केनिया, रवांडा, सेनेगल, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, मलेशिया, मोरोक्को, नायजेरिया, थायलंड आणि मादागास्कर यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan would have been destroyed: Lt. Gen. Ghai reveals Operation Sindoor details.

Web Summary : Lt. Gen. Rajiv Ghai disclosed Operation Sindoor details. Indian Navy was ready. Pakistan's DGMO requested a ceasefire during the operation, which targeted terrorist camps and airfields. The event was attended by military leaders from over 30 countries.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान