शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 05:59 IST

तामिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी काढले उद्गार; चोल साम्राज्याच्या सन्मानार्थ कार्यक्रमात सहभाग

गंगईकोंडा चोलपुरम (तामिळनाडू) : मालदीव दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू दौऱ्यात शनिवारी रात्री त्यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच लोकार्पण केले. रविवारी त्यांनी तिरुचिरापल्ली येथील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल-प्रथम यांच्या जयंतिनिमित्त आयोजित समारंभात ते सहभागी झाले. चोल सम्राट राजराज चोल आणि त्यांचे पुत्र राजेंद्र चोल-प्रथम यांचे भव्य पुतळे येथे उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

मोदी म्हणाले, ‘सार्वभौमत्वावर हल्ला झाला तर भारत कसे प्रत्युत्तर देईल हे ऑपरेशन सिंदूरने जगाला दाखवून दिले. शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे या मोहिमेने सिद्ध केले.’ भारताने पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे नागरिकांत आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.चोल कालीन लोकशाहीचा गौरव लोकशाहीबाबत बोलताना अनेक लोक ब्रिटनच्या मॅग्नाकार्टाचा उल्लेख करतात. परंतु, चोलकालीन ‘कुडवोलाई प्रणाली’ त्यापेक्षा जुनी १ हजार वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे या राजांचे पुतळे इतिहासात आधुनिक प्रेरणा ठरतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

गंगईकोंडा चोलपुरममध्ये केला ‘रोड शो’ 

प्रतिष्ठित चोल साम्राज्याचे नरेश राजेंद्र चोल-प्रथम यांच्या जयंती समारंभाच्या निमित्ताने गंगईकोंडा चोलपुरममध्ये दाखल होताच मोदी यांनी तीन किमी ‘रोड शो’ केला. आपल्या वाहनाच्या ‘रनिंग बोर्ड’वर उभे राहून त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या नागरिकांना अभिवादन केले.

पंतप्रधानांची ई.के. पलानीस्वामींनी घेतली भेट 

अण्णाद्रमुकचे सरचिटणीस ई. के. पलानीस्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांची शनिवारी रात्री तिरुचिरापल्लीत विमानतळावर भेट घेतली. मोदी यांचे स्वागत करून त्यांनी काही वेळ चर्चा केली. एप्रिलमध्ये दोन्ही पक्षांत निवडणूक आघाडी झाल्यानंतरची ही पहिलीच भेट होती.

भगवान शिवमंदिरात पूजा

चोलकालीन भगवान बृहदेश्वर मंदिरात मोदी यांनी पूजा केली. पारंपरिक सजलेला कलश त्यांनी सोबत आणला होता. या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेले आहे. शैव परंपरा आता पृथ्वीबाहेरही पोहोचली असल्याचे नमूद करून मोदी यांनी चांद्रयान-मोहिमेत विक्रम लँडर उतरले त्या स्थळास शिवशक्ती पॉइंट नाव देण्यात आल्याचे नमूद केले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरTamilnaduतामिळनाडू