शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:08 IST

India Vs Pakistan War, Rafael: भारतीय लढाऊ विमानांनी आपले क्षेत्र न सोडता पाकिस्तानात हवाई हल्ले चढविले होते. यासाठी स्काल्प क्रूझ मिसाईल आणि स्पाईस २००० ब़ॉम्बचा वापर करण्यात आला होता.

ऑपरेशन सिंदूरवेळीपाकिस्तान भारताच्या हवाई मायाजालात असा गुरफटला की त्यालाच समजत नव्हते आपण भारताची खरी लढाऊ विमाने पाडली की खोटी. पाकिस्तान नुसता सांगत राहिला आम्ही राफेल पाडले, राफेल पाडले... भारताची पाच विमाने पाडली. पण खरे तर भारताचे एकही लढाऊ विमान ना पाकिस्तानने पाडले ना कोणतेही भारतीय लढाऊ विमान पाकिस्तानात गेलेले. बाऊंड्रीवर राहूनच भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानी जमिनीवर दहशतवाद्यांना गाडले आहे. 

अमेरिकेच्या एफ-१६ लढाऊ विमानाच्या माजी पायलटने भारतीय हवाई दलाने आतापर्यंतची सर्वोत्तम स्पुफिंग आणि शत्रूची फसवणूक टेक्निक वापरल्याचे म्हटले आहे. अमेरिकन F-15E स्ट्राइक ईगल आणि F-16 थंडरबर्ड पायलट रायन बोडेनहाइमर यांनी राफेलला एक असे शस्त्र लावलेले होते ज्याने पाकिस्तानला भ्रमात ठेवले असे म्हटले आहे. राफेलमध्ये एक्स गार्ड जॅमिंग डिकॉय आणि स्पेक्ट्रा ईडब्ल्यू सूट बसविलेले होते. या दोघांनी मिळून पाकिस्तानच्या PL-15E क्षेपणास्त्रांच्या डोळ्यात धूळ फेकली होती. 

भारतीय लढाऊ विमानांनी आपले क्षेत्र न सोडता पाकिस्तानात हवाई हल्ले चढविले होते. यासाठी स्काल्प क्रूझ मिसाईल आणि स्पाईस २००० ब़ॉम्बचा वापर करण्यात आला होता. या मोहिमेत राफेल, सुखोई एसयू ३० आणि मिराज २००० ही लढाऊ विमाने वापरण्यात आली होती. पाकिस्तानने तीन राफेलसह पाच विमाने पाडल्याचा दावा केला होता. परंतू हा सारा खेळ राफेलच्या स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर एक्स-गार्ड हे इस्रायलमध्ये बनवलेले फायबर-ऑप्टिक टोव्ड डिकॉय यांनी केला होता. ही प्रणाली जर एकत्र करता आली नसती तर कदाचित भारताला हे शक्य झाले नसते. 

फायबर-ऑप्टिक टोव्ड डिकॉय हे ३० किलो वजनाचे उपकरण राफेल जेटच्या मागे वायरने ओढले जाते. हे शत्रूच्या रडार आणि क्षेपणास्त्रांना फसवण्यासाठी डिझाइन केलेले आहे. एक्स-गार्ड ३६० अंश त्रिजेमध्ये जॅमिंग सिग्नल पाठवते. ज्यामुळे शत्रूच्या रडार आणि क्षेपणास्त्रांच्या डिटेक्शन प्रणालीला गोंधळात टाकते. रडार सिग्नेचर बनावट मिळाल्याने शत्रूची उपकरणे तेच खरे असल्याचे मानतात आणि तिकडेच जातात. परंतू ते खोटे मृगजळासारखे असते. यामुळे शत्रूचा वार वाया जातो. एक्स-गार्ड आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरते जे डॉपलर शिफ्ट आणि रडार सिग्नलची सिग्नेचर कॉपी करते. तसेच शत्रूला रिअल टाईम  वेगवेगळ्या ठिकाणाचे सिग्नल पाठविते. यामुळे त्यांची विमाने किंवा मिसाईल कुठे जाऊ आणि कुठे नको अशा संभ्रमात राहतात आणि राफेल आपले काम फत्ते करून परत येते, हीच टेक्निक भारतीय हवाई दलाने वापरली आणि पाकिस्तानला चकविल्याचे बोडेनहाइमर यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दल