शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:33 IST

Donald Trump vs Narendra Modi: ट्रम्प यांनी आपणच भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचे दावे केले होते. व्यापारातील टेरिफ मुद्द्याने आपण भारताला नमते घ्यायला लावले असे ट्रम्प म्हणत होते. भारत वेळोवेळी ट्रम्प यांचे दावे खोडून काढत होता. परंतू, हे दावे कनिष्ठ पातळीवर खोडले जात होते.

ऑपरेशन सिंदूरपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मीच युद्ध थांबविल्याचा दावा करत सुटले होते. जी - ७ देशांच्या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे किंवा व्यापार कराराच्या प्रस्तावामुळे नव्हे तर पाकिस्तानच्या विनंतीवरून तूर्त थांबविले आहे, असे सुनावले होते. यानंतर आता ट्रम्प वठणीवर आले आहेत. 

भारत आणि पाकिस्तानच्या दोन समजूतदार नेत्यांनी अणुयुद्धात रूपांतरित होऊ शकणाऱ्या युद्धाला रोखण्याचा निर्णय घेतला होता, असे ट्रम्प यांनी मान्य केले आहे. 

ट्रम्प यांनी आपणच भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचे दावे केले होते. व्यापारातील टेरिफ मुद्द्याने आपण भारताला नमते घ्यायला लावले असे ट्रम्प म्हणत होते. भारत वेळोवेळी ट्रम्प यांचे दावे खोडून काढत होता. परंतू, हे दावे कनिष्ठ पातळीवर खोडले जात होते. याचा हेकेखोर असलेल्या ट्रम्प यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. आता मोदींनी कॅनडामधील जी ७ देशांच्या परिषदेतच जाऊन अमेरिकेला सुनावल्याने ट्रम्प यांना 'बरे झाले, सोनारानेच कान टोचले' या म्हणीची अनुभुती आली आहे. 

इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ट्रम्प जी७ शिखर परिषद अर्ध्यावरच सोडून वॉशिंग्टनला परतले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी त्यांना विचारले होते की, कॅनडाहून परतताना ते अमेरिकेत थांबू शकतात का? यावर मोदींनी नकार दिला होता. तसेच मोदींनी अमेरिकेच्या मध्यस्थीशिवाय दोन्ही सैन्यांमध्ये थेट संवाद झाला आणि त्यानंतर लष्करी हालचाली थांबवण्यात आल्या, असेही ट्रम्पना स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तान