शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 21:33 IST

भारताने पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टराटरा फाडण्यासाठी जगभरात खासदारांना पाठविले होते. सर्वपक्षीय खासदारांचा यात समावेश होता.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे लाख प्रयत्न केले होते. भारतीय सैन्य दलांनी मिळून पाकिस्तानचे तुर्की आणि चीनने दिलेले ड्रोन व मिसाईल हवेतच उडवून लावले होते. यानंतर भारताने पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टराटरा फाडण्यासाठी जगभरात खासदारांना पाठविले होते. सर्वपक्षीय खासदारांचा यात समावेश होता. हे खासदार आपली कामगिरी फत्ते करून मायदेशात परतले आहेत. या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत या मोहिमेबद्दल वृत्तांत दिला आहे.   

या मोहिमेत भाजपासह टीएमसी, काँग्रेसचे देखील खासदार होते. या खासदारांनी वेगवेगळ्या देशांत जात त्यांच्या राजधानीमध्ये पाकिस्तानने जन्माला घातलेला दहशतवाद आणि भारताची भूमिका मांडली. या प्रतिनिधीमंडळांनी आज मोदींना आपापले अनुभव सांगितले. सात प्रतिनिधीमंडळ देशोदेशी रवाना झाली होती. यामध्ये ५० खासदार होते. त्यांनी ३३ देशांच्या राजधानी आणि युरोपीय संघाचा दौरा केला. मोठ्या ताकदीने भारताने आपली बाजू जगासमोर मांडली. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता आणि तो कमालीचा यशस्वी झाला आहे. पाकिस्तानला साथ देणाऱ्या देशालाही त्यांचे म्हणणे मागे घ्यावे लागले आहे. 

सातपैकी चार प्रतिनिधीमंडळांचे नेतृत्व सत्ताधारी एनडीएने तर तीन प्रतिनिधीमंडळांचे नेतृत्व विरोधकांनी केले होते. देशात कितीही विरोधात असले तरी सर्वजणांनी जगात एकी दाखविली आणि पाकिस्तानची झोप उडविली आहे. भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जद(यू)चे संजय झा, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, द्रमुकच्या कनिमोळी आणि राष्ट्रवादी(सपा)च्या सुप्रिया सुळे यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. 

या मोहिमेवरून परतल्यानंतर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वर्धापन दिनासाठी महाराष्ट्रात आल्या होत्या. तो कार्यक्रम आटोपून त्या परत दिल्लीला मोदींची भेट घेण्यासाठी परतल्या. या प्रतिनिधीमंडळांमध्ये ओवोसींसारखा आक्रमक चेहरा देखील घेण्यात आला होता. ओवेसींनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात उघड भूमिका घेतली होती.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीSupriya Suleसुप्रिया सुळेShashi Tharoorशशी थरूर