शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
4
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
5
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
6
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
7
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
8
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
9
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
10
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
11
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
12
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
13
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
14
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
15
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
16
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
17
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
18
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
19
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
20
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...

भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:34 IST

Operation Sindoor: पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याचा संकल्प केला असला तरी, त्यांचे हल्ले भारताला धडा शिकवण्यासाठीच्या घोषणेप्रमाणे प्रत्युत्तरात्मक नाहीत.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करून या संघर्षात विजयाचा दावा करत असताना, संयम दाखवण्याची चिन्हे देखील दिसत आहेत. पाकिस्तानने गुरुवारी रात्री २६ भारतीय ठिकाणांवर ३०० ते ४०० ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आणि बठिंडा लष्करी तळाला लक्ष्य केले, तेव्हाही भारताची प्रतिक्रिया संयमाची होती. असा अंदाज आहे की, तणाव कमी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते.

भारताने याबाबत जी अधिकृत माहिती दिली त्यावेळीही कठोर शब्द वापरले नाहीत. या हल्ल्यांमध्ये काही सैनिक शहीद झाल्याचे मान्य केले. भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचेही मोठे लष्करी नुकसान झाले आणि त्यांचेही काही जवान मारले गेले. तरीही हल्ल्यांमध्ये एक मर्यादा रेषा आहे. ती अशी की, दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही. 

पाकिस्तानला वेळ आणि संधीशुक्रवारीही भारताने पाकिस्तानच्या चुकीच्या कारवायांना प्रत्युत्तर देताना प्रचंड संयम दाखवला आहे आणि असे सूचित केले आहे की, ते शेजारी देशाला लष्करी कारवाईचा मार्ग सोडून देण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देत आहे. 

आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याचा संकल्प केला असला तरी, त्यांचे हल्ले भारताला धडा शिकवण्यासाठीच्या घोषणेप्रमाणे प्रत्युत्तरात्मक नाहीत. पाकिस्तानने काही प्रमाणात उल्लंघन केले असले तरीही दोघांनीही अधिकृतपणे सांगितले आहे की, त्यांनी लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे आणि मोठे नुकसान केले आहे. भारताची ५ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे; परंतु दाव्याला दुजोरा देणारा कोणताही पुरावा नाही. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर