शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

१०-१२ नाही तर तब्बल २८ ठिकाणी भारताने केला हल्ला, विव्हळणाऱ्या पाकिस्तानने स्वत: दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:43 IST

Operation Sindoor:

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या सैन्यदलांनी  ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले होते. तसेच भारताच्या या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांना उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानला जबरदस्त हादरा बसला होता. तसेच पाकिस्तानच्या लष्कराने युद्धविरामासाठी विनवणी सुरू केली होती. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर केलेल्या जबर आघाताची कबुली आता पाकिस्ताननेच दिली आहे.

पाकिस्तानकडून तयार करण्यात आलेल्या ऑपरेशन बुनयान उन मर्सूससंबंधित कागदपत्रांमधील उल्लेखानुसार भारताने पाकिस्तानमधील आणखी आठ ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. या ठिकाणांचा उल्लेख भरातीय हवाई दल आणि डीजीएमओ यांनी ७ मे रोजी करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलेला नाही.

पाकिस्तानने तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये ज्या शहरांवर हल्ला झाल्याचा नव्याने उल्लेख करण्यात आला आहे, त्यामध्ये पेशावर, झंग, सिंधमधील हैदराबाद, पंजाब प्रांतातील गुजरात, गुजरांवाला, बहावलनगर, अटक आणि छोर यांचा समावेश आहे. या भागात हल्ला झाल्याचे डोजियरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशामधून समोर आलं आहे. त्यामाध्यमातून भारताने केलेल्या हल्ल्याची तीव्रता लक्षात येते. भारताने या कारवाईसाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. तसेच या क्षेपणास्त्रांसमोर पाकिस्तानी सैन्य हतबल झाल्याचं दिसून आलं होतं.

नव्याने समोर आलेल्या या माहितीमुळे भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली कारवाई ही आधी वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजांपेक्षा अधिक व्यापक आणि तीव्र असल्याचे स्पष्ट  झाले आहे. तसेच या माहितीमुळे पाकिस्तानकडून भारताला झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानाबाबत करण्यात येत असलेला दावाही खोटा असल्याचे उघड झाले आहे.

  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत प्रत्युत्तरदाखल कारवाई केली होती. तेव्हा भारतीय सैन्यदलांकडून बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचा अड्डा, मुरिदके येथील लष्कर ए तोयबा याचं प्रशिक्षण केंद्र यांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तसेच मुझफ्फराबाद, कोटली, रावलकोट, चाकस्वारी, भिंबर, नीलम खोरे, झेलम आणि चकवाल येथील अड्ड्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ल्याचा प्रयत्न झाल्यावर भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान, रफिकी, मुरिद, सुक्कूर, सियालकोट, पसरूर, चुन्नियन, सरगोधा, स्कर्दू, भोलारी आणि जेकोबाबाद या हवाई तळांना लक्ष्य करत मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवला होता. त्यामुळे पाकिस्तानला तीन दिवसांच्या आतच युद्धविरामासाठी विनवणी करावी लागली होती.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान