शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:01 IST

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ड्रोन डागले. पण प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही.

ऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्ताननेगुजरातवर मिसाईल्स आणि ड्रोन डागले. पण प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. बीएसएफ गुजरात फ्रंटियरचे महानिरीक्षक अभिषेक पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सीमेवर टँक तैनात केले आहेत. पुढच्या वेळी आणखी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व गोष्टींचं विश्लेषण केलं जात आहे.

"पाकिस्तानने गुजरातवर ६०० ड्रोन डागले"

राजस्थानमधील बारमेर ते गुजरातच्या कच्छ जिल्ह्यापर्यंत बीएसएफ भारत-पाकिस्तान सीमेचं रक्षण करत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान बीएसएफच्या भूमिकेबद्दल गांधीनगरमध्ये पत्रकार परिषदेत पाठक म्हणाले की, "राजस्थान ते कच्छपर्यंत आपल्या सीमेवर पाकिस्तानने पाठवलेल्या जवळपास ६०० ड्रोनपैकी सुमारे ४० टक्के (२०० ड्रोन) गुजरातमध्ये घुसले. आम्ही लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या मदतीने हल्ले हाणून पाडले. सैन्याचं किंवा सामान्य जनतेचं कोणतंही नुकसान झालं नाही. काही ड्रोन पाडण्यात आले."

दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त 

भारताने पीओकेमध्ये प्रवेश करून ऑपरेशन सिंदूर केलं. या ऑपरेशनमध्ये १६० हून अधिक लोक मारले गेले, ज्यात दहशतवादी, त्यांचे सहकारी आणि पाकिस्तानी लष्करी कर्मचारी यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. 

मसूद अझहरच्या नातेवाईकांचा खात्मा 

ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचं महत्त्वाचं ठिकाण असलेल्या बहावलपूरमधील २० हून अधिक लोक मारले गेले. बहावलपूरमध्ये मारले गेलेले बरेच जण जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जातं. पाकिस्तानी सैन्याचंही मोठं नुकसान झालं आहे. मात्र पाकिस्तानने अधिकृतपणे फक्त ११ जणांचा मृत्यू आणि ७८ जण जखमी झाल्याची कबुली दिली आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाGujaratगुजरातTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान