शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? काही आमदार रायपूरमध्ये, राजकीय हालचालींना वेग, आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 07:13 IST

Operation Lotus: झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे.

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे. महाराष्ट्रात अलीकडेच शिवसेनेत झालेल्या फुटीपासून धडा घेऊन महाआघाडीच्या आमदारांना काँग्रेसशासित छत्तीसगढमध्ये नेण्यात आले आहे. रायपूरमध्ये जाणाऱ्यांमध्ये यूपीएच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. तथापि, या आमदारांबरोबर मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच झामुमोचे काही आमदार गेलेले नाहीत.

यूपीएच्या ३२ आमदारांसह ३५ नेते रांची विमानतळावरून विशेष विमानाने रायपूरकडे रवाना झाले. यात सत्ताधारी झामुमोचे १९, काँग्रेसचे १२ व राजदच्या एका आमदाराचा समावेश आहे. याबरोबरच काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर व संतोष पांडेय यांचाही त्यात समावेश आहे. महाआघाडीत कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. 

रायपूरमध्ये मेफेअर गोल्ड रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग करण्यात आले आहे. हॉटेलला हाय सिक्युरिटी झोन जाहीर करण्यात आले आहे. तेथे एक डीएसपी व दोन पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तथापि, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सध्या रांचीमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याबाबत गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. 

खुर्चीची लालसा  नाही - सोरेनझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पत्रकारांना सांगितले की, कोणतेही अघटित घडणार नाही. कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधारी तयार आहेत. अनेक वेळा रणनीतीनुसार काम केले जाते. त्याची छोटीशी झलक आपण पाहिली. मला खुर्चीची लालसा नाही, त्यामुळे तणाव नाही.

हवाईमार्गे छत्तीसगढमध्येयूपीए आमदारांना छत्तीसगढमध्ये नेले जाईल, अशी चर्चा होती. तथापि, त्या दिवशी तीन बसमधून यूपीए आमदारांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबरोबर खुंटी जिल्ह्यातील लतरातू धरणावर नेण्यात आले होते. खुंटी, नेतरहाटमार्गे हे सर्व आमदार छत्तीसगढमध्ये जातील, अशी चर्चा होती. परंतु त्यावेळी तसे न हाेता मंगळवारी आमदारांना हवाईमार्गे नेण्यात आले.

nराज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सत्ताधारी आमदार राज्याबाहेर जात आहेत, हे विशेष. एकीकडे दुमकामध्ये अंकिता हिला जिवंत जाळण्याच्या टनेबद्दल आक्रोश आहे. या घटनांमुळे भाजपने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

झारखंडचा ‘महाराष्ट्र’ होणार नाही : अविनाश पांडेनवी दिल्ली : आमदारांना आमिष दाखवून महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यात भाजपला यश आले. त्याप्रमाणे ‘ऑपरेशन लोटस’ झारखंडमध्ये यशस्वी होणार नाही, असा दावा काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी व माजी खासदार अविनाश पांडे यांनी केला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विधानसभा सदस्यत्वाबद्दल वाद उत्पन्न झाला आहे. यासंदर्भात झारखंडच्या राज्यपालांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. परंतु झारखंडमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ करण्याचा निश्चय भाजपने केल्याचा दावा अविनाश पांडे यांनी केला आहे. यूपीएचे सारे आमदार एकजूट असल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपा