योगासाठी ‘आॅपरेशन डोगा’

By Admin | Updated: June 18, 2015 01:35 IST2015-06-18T01:35:43+5:302015-06-18T01:35:43+5:30

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या २१ जून रोजी राजपथवर होणाऱ्या समारंभादरम्यान कडेकोट सुरक्षा बंदोबस्तासाठी सशस्त्र दलातर्फे

'Operation Doga' for Yoga | योगासाठी ‘आॅपरेशन डोगा’

योगासाठी ‘आॅपरेशन डोगा’

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या २१ जून रोजी राजपथवर होणाऱ्या समारंभादरम्यान कडेकोट सुरक्षा बंदोबस्तासाठी सशस्त्र दलातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याचे नामकरण ‘डोगा’असे करण्यात आले आहे.
आॅपरेशन डोगाअंतर्गत दिल्लीतील हा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात येईल आणि सुरक्षा बंदोबस्तात प्रशिक्षित श्वान तैनात केले जातील.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निमलष्करी दल आयटीबीपीचे श्वानपथक यात महत्त्वाची भूमिका वठविणार आहे. त्यामुळे ‘डॉग’आणि ‘योग’ या दोन शब्दांचा मेळ घालून ‘डोगा’(डीओजीए) असे नाव देण्यात आले आहे. इंडिया गेट ते राजपथ या मार्गावरील मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट मंत्र्यांसह ४०,००० लोक सहभागी होणार आहेत.
आयटीबीपीच्या श्वानपथकाने यापूर्वीही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Operation Doga' for Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.