चंद्रपुरात खंडेलवाल ज्वेलर्सच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:18+5:302015-02-06T22:35:18+5:30
फोटो - रॅपमध्ये

चंद्रपुरात खंडेलवाल ज्वेलर्सच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन
फ टो - रॅपमध्ये चंद्रपूर : नागपूरचे प्रसिद्ध ज्वेलर्स, ज्वेलरी ब्रॅण्ड खंडेलवालतर्फे चंद्रपुरात सोने व हिऱ्यांच्या आभूषणांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन समाज महिला अध्यक्ष शकुंतला भाटिया, माहेश्वरी समाज महिला अध्यक्ष आनंदी सारडा, शितल पडगीलवार, अश्विनी बल्की यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी श्रद्धा मुनगंटीवार, नीलम डावर, कविता उमाटे, निधी तांडव, भारती उमाटे, नैना भगत, खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक राजेश खंडेलवार व धनराज खंडेलवार उपस्थित होते. चंद्रपूरच्या ट्राईस्टार हॉटेलमध्ये चार दिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळी ११ ते रात्री ८.३० पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहकांना २२ कॅरेट सोन्याच्या खरेदीवर १० टक्के सूट व डायमंड ज्वेलरीवर २० टक्के सूट देण्यात आली आहे. प्रदर्शनात गोल्ड व डायमंडचे मंगळसूत्र, सेट्स, ब्रेस्लेट, पेन्डेंट आदी आभूषणांचे विविध प्रकार उपलब्ध आहे. लग्नाचे मुहूर्त सुरू असल्याने, खरेदीसाठी चांगली संधी आहे.