महागाव येथे आज खुल्या कब्बड्डी स्पर्धा

By Admin | Updated: May 9, 2014 18:10 IST2014-05-09T18:10:51+5:302014-05-09T18:10:51+5:30

Open Kabbadi Tournament in Mahagaon today | महागाव येथे आज खुल्या कब्बड्डी स्पर्धा

महागाव येथे आज खुल्या कब्बड्डी स्पर्धा

>गडहिंग्लज :
महागाव (ता. गडहिंग्लज) येथे केदारी रेडेकर फौंडेशनतर्फे उद्या (शनिवार) दुपारी ४ वाजता खुली कब्बड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विजेत्यांसाठी १५००१, १०००१, ५००१, ३००१ आणि उत्कृष्ट पकडसाठी ५०१, उत्कृष्ट चढाईसाठी ५०१ व सवार्ेत्कृष्ठ खेळाडूला ७०१ आणि चषक अशी बक्षीस योजना आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस ही स्पर्धा होईल.
महागाव येथील शिवाजी चौकातील मैदानात होणार्‍या स्पर्धेचे पंच म्हणून सुरेश तिळवले व दीपक चौगुले हे काम पाहणार आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी समन्वयक किरण पाटील व शिवाजी कोंडुसकर आणि सहकारी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Open Kabbadi Tournament in Mahagaon today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.